बीड (प्रतिनिधी) संत गाडगेबाबा यांचा स्वच्छतेचा मूलमंत्र पुन्हा एकदा सर्व शासकीय कार्यालय व नागरिकांनी आंगीकारला पाहिजे बीड शहरातील घाणीचे साम्राज्य दूर झाले पाहिजे,दिव्या खालचा अंधार दिव्याला दिसत नसतो, तो दुसऱ्यांना दिसतो पण दिव्याला दिसत नाही अशीच परिस्थिती बीड शहरातील मुख्य कार्यालयाची झाली आहे त्या मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय,शहर बस स्थानक,जिल्हा शासकीय रुग्णालय, पोलिस मुख्यालय या प्रमुख इमारतीमध्ये कचऱ्याचे ढीग व अस्वच्छता दिसून येत आहे,जिल्हाधिकारी कार्यालया समोरील पानपोई बंद आहे.
बीड शहरात येणाऱ्या नवीन पाहुण्याचे स्वागत बस स्टँड मधील असलेल्या घाणीच्या साम्राज्यात ने होते, बंद पडलेली पिण्याच्या पाण्याची टाकी बस स्टॅन्ड परिसरातील चारी बाजूला कचऱ्याचे ठीक व अस्वच्छता याने बीड शहरात नवीन व्यक्तीचे स्वागत केले जाते ही बसस्थानकातील परस्थिती आहे.
पुढे आपण जिल्हा रुग्णालय परिसरात गेला तर ज्या ठिकाणी आरोग्य सेवा दिली जाते व तिथे अनेक रुग्ण विविध आजारावर उपचार घेत आहेत तो परिसर देखील अस्वच्छ दिसुन येते, परिसरात साफसफाई व अस्वच्छतेचा आभाव पावलोपावली दिसून येतो,या घाणी मुळे लवकर बरे होण्या पेक्षा रुग्ण अधिक आजारी होत असतील अशी परिस्थिती आहे,सर्वत्र दुर्गंधी आहे.
जवळच बाजूलाच पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय आहे त्या ठिकाणची परिस्थिती वेगळी नाही एकंदरीतच समोरील भागातच अस्वच्छता घाण कचरा जमा आहे त्या ठिकाणी साफसफाई स्वच्छता आवश्यक आहे.या चारही महत्त्वपूर्ण कार्यालयाच्या ठिकाणी अस्वच्छता दिसून येत आहे म्हणूनच म्हणावं लागेल की दिव्याखालचा अंधार
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगरपालिकेने जरी पारितोषिक मिळवले आसले तरी दर दिवस या कार्यालाची स्वच्छता करणे आवश्याक आहे.
शहरातील मुख्य कार्यालयाची अवस्था आशी आहे तर असून मोढा,भाजी मंडई,ईतर ठिकाणी परिस्थिती व इतर भागातील परिस्थिती भयावह आहे परिस्थितीला नगरपालिका नागरिक किती जबाबदार आहे, आपन स्वच्छता ठेवली तरच परिसर सुंदर दिसेल आरोग्य सुधारे यासाठी सुजाण नागरिकांनी घरातील कचरा घंटागाडी व कचरा कुंडीत टाकावा कचरा इतरत्र फेकून देऊन समस्येत वाढ करू नये,
शासनाच्या अनेक योजना आल्या आणि गेल्या परंतु त्या फक्त कागदावरच राबवल्या का प्रश्न निर्माण होतो,स्वच्छतेच्या नावाखाली नगरपालिकेकडून लाखोची बिले काढली जातात,खरंच स्वच्छता होते का हा प्रश्न निर्माण होतो ,संबंधित यंत्रणां या गोष्टीचा विचार करणे काळाची आहे.
No comments:
Post a Comment