
प्रभू वैद्यनाथ

गेल्या दोन वर्षापासून कोरोना विषाणूच्या प्रादूभावामुळे मंदिरे बंद करण्यात आली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मंदिरे दर्शनासाठी खुले करण्यात आल्याने तब्बल दोन वर्षानंतर महाशिवरात्री पर्वाच्या निमित्ताने यंदा दर्शनासाठी मंदिर खुले असल्याने शिवभक्तांनी येथील प्रभू वैद्यनाथानाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.

दरम्यान यात्रा होणार का ? नाही होणार ? ग्रामीण भागातील लालपरी बंद असल्याने गर्दीवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

तसेच महाशिवरात्री पर्वाच्या निमित्ताने भाविक भक्तांसाठी विविध सामाजिक संस्थेच्या वतीने खिचडी प्रसाद, शुध्द पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात येत आहे.

भाविक भक्तांच्या गर्दीच्या निमित्ताने पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त, सीसीटीव्ही कँमेरे लक्ष ठेवून आहेत. तर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविक भक्तांच्या दर्शनासाठी महिला, पुरुष, पासधारकांसाठी स्वतः व्यवस्था करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment