Tuesday, March 29, 2022

हजरत चांदशाहावली बाबा दरगाह परिसरात अस्वस्थता व घाण करणाऱ्या विरोधात गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतिने सरपंच व पोलीसांनी निवेदन .


बेलापूर  (प्रतिनीधी) बेलापूर येथील बुरुड गल्ली नंबर 1 मध्ये जिल्हा प्राथमिक उर्दु शाळेच्या पाठीमागे असणारी प्राचीन देवस्थान दरगाह हजरत चांदशाहवली बाबा यांचेळ जागृत देवस्थान आहे. ही जागा पूर्वीपासून असून हे एक जागृत देवस्थान आहे या ठिकाणी अनेक श्रद्धाळू बाहेरून येणारे भाविक या ठिकाणी सतत येत असतात परंतु काही दिवसांपासून त्या ठिकाणी राहणारे व्यक्ती (गाढव वाले) दर्गा परिसरात गाढवे बांधीत आहेत त्या ठिकाणी राहणारे लोकांनी घरातील कचरा पण त्या ठिकाणी टाकतात. त्यामुळे दर्गाह परिसरात ठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली आहे. अशी अस्वच्छता निर्माण न व्हावी यासाठी  अजून गौसे सेवाभावी संस्था - संस्थेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या लोकांना व गाढवा वाल्यांना व कचरा टाकणाऱ्यांना समजावून सांगितले परंतु त्यांनी काही मानले नाही व दररोज त्या ठिकाणी गाढव बांधत आहेत. 
    दोन दिवसापूर्वी एका गाढवाला त्या दर्गा च्या परिसरात लघवी करताना आढळून आलेला आहे त्याचे छायाचित्र निवेदनात जोडून दिलेले आहे व रात्रीच्या वेळेस गाढवे दर्गाह परिसरात बांधलेली असतात. अस्वच्छता असल्यामुळे दर्गाला मानणारे भाविकांचे या भावना दुखवत आहे व भाविकांच्या मनात तीव्र संताप निर्माण झालेला आहे असे पत्रात नमूद करून सरपंच ग्रामपंचायत बेलापूर बुद्रुक व पोलीस निरीक्षक श्रीरामपुर शहर यांना देण्यात आले...
   निवेदन देण्यासाठी गौसे आजम सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष - सुलतान शेख , संस्थापक - मुख्तार सय्यद , कार्यअध्यक्ष - आयन शेख , उपकार्यध्यक्ष - नासिर शेख ,खजिनदार - मुयर मोरे, हारून अत्तार ,मोहसीन सरदार सय्यद, आकाश गाळंफाडे , विकास चोपड़े ,नासिरभाई शेख, महिला अध्यक्ष - सना काझी व संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment