परळी वैजनाथ (प्रतिनिधी) माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी आज बुधवार दि.30 मार्च रोजी राष्ट्रवादी काँगे्रस सामाजिक न्याय विभागाचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.विनोद जगतकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी आज बुधवारी प्रा.डॉ.विनोद जगतकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी प्रा.जगतकर यांनी जयसिंगराव गायकवाड यांचे शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचा जिल्हाध्यक्ष म्हणून उत्तम पणे कार्य करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी वैजनाथराव सोळंके, अनंत इंगळे, गिरीश भोसले, सुरेंद्र कावरे तसेच जगतकर गल्लीमधील ज्येष्ठ नागरिक बाबुराव अवचारे, शंकरराव साळवे, दत्ताभाऊ सावंत, राज जगतकर, जतीन जगतकर, साहेबराव कसबे, अमर कसबे, अशोकभाऊ जगतकर इत्यादी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment