Wednesday, March 30, 2022

स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील परिसर मुलाखतीमध्ये .जस्ट डायल कंपनीमध्ये 4 मुलांची निवड.


 
*आत्मविश्वास व कौशल्यातून नोकरीची संधी प्राप्त होते.

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयामध्ये  प्रशिक्षण व सेवायोजन कक्षाच्या वतीने जस्ट डायल लिमिटेड पुणे मुलांसाठी  परिसर मुलाखतीचे (कॅम्पस इंटरव्ह्यू) आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री.अमर माळी म.शि. प्र. मंडळ ट्रेनिग & प्लेसमेंट ऑफिसर यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला.  यावेळी त्यांनी मुलाखतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले, की आत्मविश्‍वास व कौशल्याच्या जोरावर आपण मुलाखत सहज यशस्वी करू शकता व आपले ध्येय पूर्ण करू शकता. आज पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयामध्ये परिसर मुलाखतीच्या माध्यमातून रोजगाराची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आहे .यामध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळेल .परंतु त्या नोकरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेचे महाविद्यालयाचे नाव मोठे करावे आज कोरोना काळामध्ये नोकरी आपल्या दारी आली आहे. आपली संस्था विद्यार्थ्यांचे हित विचारात घेता अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देते असे प्रतिपादन केले.
     
     मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आदरणीय आ. श्री. सतीश भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल स्थापन झाला असून विद्यार्थ्यांना रोजगार देण्यासाठी त्यामार्फत कार्य केले जाते असेही त्यांनी नमूद केले.  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.आ. प्रकाश दादा सोळंके यांचे मार्गदर्शन व प्रेरणा परिसर मुलाखती आयोजनामागे नेहमीच असते.  त्याच बरोबर संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. अविनाश येळीकर यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले. जस्ट डायल या मुलाखतीमध्ये एकूण 64 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांच्या निवड प्रक्रिया च्या माध्यमातून एकूण 55 मुलांनी मुलाखत दिली. त्यातून चार मुलांची निवड करण्यात आली. परिसर जस्ट डायल कंपनीचे टीम लीडर श्री.चेतन कुमार गुट्टे  यांनीपरिसर मुलाखती घेतल्या. 
     यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनमाला गुंडरे  यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले की परिसर मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुलाखतीला सामोरे जाण्याचे कौशल्य यानिमित्ताने शिकण्यास मिळेल असा आशावाद व्यक्त केला. व्यासपीठावरती मा. श्री अजयजी सोळंके उपस्थित होते.
       यावेळी कॅम्पस मुलाखतीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय विकास समिती सदस्य मा.ना.श्री. धनंजय जी मुंडे साहेब सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य श्री उत्तमराव देशमुख, श्री सुभाष येळीकर, श्री शरदभैय्या सोळंके यांनी परिसर मुलाखती मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
     या परिसर मुलाखतींचे आयोजन स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये प्रा. गिरिष चाटे, प्रा. कांबळे, प्रा.आघाव, प्रा.गव्हाणे, प्रा. नितीन कदम, प्रा.लव्हाळे, प्रा.बनसोडे मॅडम,  प्रा.देशमुख मॅडम, प्रा.कांबळे मॅडम श्री दत्ता सौंदळे, श्री अमोल सरवदे,  सौ.लता मिसाळ या सर्वांनी यावेळी मुलाखती यशस्वी करण्यासाठी खुप मोठे परिश्रम घेतले. यावेळी प्रा. डॉ.श्रीहरी पंढरीनाथ गुट्टे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रास्ताविक प्रा.डॉ. एल. आर मुंडे यांनी केले. तर आभार प्रा. संकेत हंडीबाग यांनी केले.

No comments:

Post a Comment