Sunday, March 27, 2022

सन्मान मराठी अस्मितेचा सन्मान मराठी संस्कृती जतन करणाऱ्या गुणीजनांचा.


*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या "शिवतीर्थ" मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय.

 परळी वैजनाथ (प्रतिनिधी)येथे आज दि २६/०३/२२ शनिवार रोजी
सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे, राज्य सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष अशोक भाऊ तावरे, प्रवक्ते प्रकाश काका महाजन यांच्या सुचणे वरून मनसे जिल्हा अध्यक्ष सुमंत धस, मनसे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखाताई अंबुरे, यांच्या मार्गदर्शनाखाली, परळी वैजनाथ शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या नेतृत्वाखाली अखील भारतीय वारकरी मंडळ आयोजित महाराष्ट्र राज्य संत संमेलन राज्य उपाध्यक्ष पदी ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांची निवड झाल्याबद्दल व परळीच्या वैभवात आपल्या अध्यात्मिक संशोधन पुर्ण लिखानातून "सार्थ विवेक सिंधु" या ग्रंथाचे लिखाण करणारे ह.भ.प.अॅड.दत्तात्रय महाराज आंधळे यांचा हृदय सत्कार करण्यात आला या वेळी बोलताना ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे
यांनी समाजकार्य तथा वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन संस्कृती जतन करण्यासाठी प्रयत्न करणं हे वारकरी संप्रदायाचा पाया आहे असं सांगितलं तर ह.भ.प.अॅड.दत्तात्र्य महाराज आंधळे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की संशोधन पुर्ण खरा इतीहास मग तो संताचा असो की महापुरुषांचा जगासमोर मांडणे ही काळाची गरज आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अॅड.अश्विन साळवे, यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की वारकरी संप्रदाय हा भारतीय संस्कृतीचा कणा आहे, या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या माण्यवरांचे सत्कार मनसेचे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल झिलमेवाड व अॅड.अर्जुन सोळंके, यांनी केले तसेच कार्यक्रमाचं प्रस्ताविक भाषण शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी केले तसेच सूत्रसंचालन मनसेचे शहर उपाध्यक्ष गणेश चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन शहर उपाध्यक्ष प्रशांत कामाळे यांनी केले, या कार्यक्रमास मनसेचे शहर उपाध्यक्ष महेश शिवगण, धनराज आवाड, सुहास विर, महेश घेवारे, धनंजय गाडवे, सिद्धार्थ लांडगे, सुमित कलशेट्टे, बाबा देशमुख, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment