Monday, March 28, 2022

मित्राच्या लग्नसोहळ्यात बेधुंद नाचलेल्या तरुणाचा पाणी पिल्यानंतर मृत्यू.


माजलगाव (प्रतिनिधी)  मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत बेधुंद नाच केल्यानंतर थकलेल्या युवकाने पाणी पिताच तरुणाचा‌ हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी येथे रविवार दि. 27 मार्च रोजी रात्री घडली.

शिंदेवाडी येथे रविवारी सायंकाळी माने — शिंदे परिवारात विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. वधू वर शिंदे वाडी या गावातील असले तरी नवरदेव अक्षय माने याचे माजलगाव व मनूर येथील मित्र विवाह सोहळ्यास हजर होते. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मारुतीच्या पाया पडण्यासाठी नवरदेवाला घेऊन जात असताना नवरदेवाचा मित्र वैभव रामभाऊ राऊत हा या मिरवणुकीत वाद्याच्या तालावर बेधुंदपणे नाचला. दिवसभर प्रचंड उन व वाढलेली उष्णता अशात बेधुंद केलेला नाच चांगलाच अंगलट आला मिरवणूक लग्न स्थळी पोहोचल्यानंतर नाचून थकलेल्या वैभव राऊत ने तहान लागली म्हणून खुर्चीवर बसून पाणी पिले यातच त्याला हृदयविकाराचा धक्का बसला त्यामुळे गोंधळ उडाला. वैभव व्यास तात्काळ माजलगाव मधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

No comments:

Post a Comment