Friday, March 25, 2022

परळी नगरपरिषदेच्या 100 कोटी च्या "भुयारी गटार योजनेच्या" बोगस कामाच्या ढिसाळ नियोजनामुळे महावितरण सहायक अभियंता नम्रता देशमुख या गंभीर अपघातात बालबाल बचावल्या.


*माणसे मेल्यावरच न. प. प्रशासनाने समाधान होणार आहे का ? प्रा पवन मुंडे.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी नगरपरिषदेच्या बहुचर्चित 100 कोटी भुयारी गटार योजनेच्या बोगस कामाच्या ढिसाळ नियोजना मुळे जागोजागी गटाराच्या पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदून ठेवले असून, ते खड्डे व्यवस्थित पणे न बुझवल्याने आज महावितरण च्या सहायक अभियंता नम्रता देशमुख यांचा गंभीर अपघात झाला असून त्यांना पुढील उपचारासाठी समर्थ हॉस्पिटल परळी येथे ऍडमिट केले आहे.
शहरात जागोजागी नगर पालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या गलथान रस्ते गलथान नियोजनाचा कळस गाठला असून ठिकठिकाणी खड्डे खंदुन ठेवल्याने नागरिक जीव मुठीत ठेऊन रस्त्यावरून वागत असून आज महावितरण च्या सहायक अभियंता नम्रता देशमुख या महावितरण कार्यालयाच्या समोर न.प. परिषदेच्या भुयारी गटार योजनेअंतर्गत कामाच्या खोदलेल्या खड्ड्यामुळे त्या पडल्या व त्या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत,अपघातानंतर संबंधित गुत्तेदाराने जुजबी कार्यवाही करत तो खड्डा दुरुस्त केला असून अगोदरच हा खड्डा दुरुस्त केला असता तर अपघात टळला असता अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत असून,  नगरपालिकेच्या या ढिसाळ कारभाराचा माणसे मेल्यावरच न. प. प्रशासनाने समाधान होणार आहे का ? असा सवाल भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी उपस्थित करून सदरील घटनेचा निषेध केला आहे.

No comments:

Post a Comment