*जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली मागणी.
बीड (प्रतिनिधी) दि. 26 अँड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर अक्षेपआर्य विधान करणाऱ्या शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या वर कडक कायदेशीर कार्यवाही करणे
बीड जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचीत बहुजन आघाडीचे सर्व्हेसर्वा अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर बिनाबुडाचे तथ्यहीन आरोप करणारे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आकलेचे तारेतोडत व स्वताला प्रसिध्दी भेटावी या हेतुने अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर जे गंभीर स्वरुपातील आरोप केले आहे. या विधानाचा आम्ही तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करतो. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा बोलवताधणी कोण आहे याची उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे व बेजाबदारपणे केलेल्या व्यक्तव्याची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील,युनूस शेख दगडू गायकवाड पुष्पाताई तुरकमाने पुरूषोत्तम वीर बालाजी जगतकर डॉ. गणेश खेमाडे अनुरथ विर, सुशिल काकडे,शेख मैनौदीन आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment