फेब्रुवारीपर्यंत देशातील 96 टक्के रेशन कार्डधारकांनी ‘एक राष्ट्र-एक रेशन कार्ड’ योजनेत नोंदणी केली आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये नावनोंदणीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, आता ही अंतिम मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षाकायद्यांतर्गत, स्थलांतरित लोकांसाठी, जे त्यांच्या तात्पुरत्या कामाच्या ठिकाणी रेशनपासून वंचित आहेत, त्यांच्यासाठी आधार कार्ड हे रेशनकार्डशी लिंक करणं महत्त्वाचं आहे. कारण, त्यानंतरच कोणत्याही ठिकाणी रेशनचा लाभ घेता येणार आहे.
असे करा लिंक
– सर्वप्रथम uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
– आता तुम्ही ‘Start Now’ वर क्लिक करा.
– येथे तुम्हाला तुमचा पत्ता भरावा लागेल.
– नंतर Ration Card Benefit या पर्यायावर क्लिक करा.
– आता तुमचा आधार कार्ड क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक, ई-मेल एड्रेस आणि मोबाईल क्रमांक आदी माहिती भरा.
– ओटीपी भरल्यानंतर स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मेसेज मिळेल
– ही सर्व प्रक्रिया पूर्ण होताच, तुमचा आधार व्हेरिफाय होईल आणि तुमचं आधार कार्ड हे रेशन कार्डशी लिंक केलं जाईल.
No comments:
Post a Comment