*छ.शिवाजी महाराज हे स्त्रियांचा सन्मान करणारे राजे होते-ह.भ.प.कृष्णा महाराज मोरे.
*प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न.*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)या संपुर्ण जगात आपल्या राज्यातीलच नव्हे तर शत्रूच्या स्त्रियांना माता-भगिनी मानुन त्यांचा सन्मान करणारे आदर्श राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे होते असे म्हणत लोणारवाडी येथे मावळे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित कीर्तन कार्यक्रमात ह.भ.प.कृष्णा महाराज मोरे यांनी गावकऱ्यांना प्रबोधन केले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मौजे लोणारवाडी येथे मावळे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने ग्राम दैवत हनुमान मंदिर परिसरात साजरी करण्यात आली. युवासेना बीड जिल्हा समन्वयक तथा जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अतुल दुबे,गावचे सरपंच नवनाथ मुंडे,जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे योगेश जाधव, बजरंग औटी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी, जिजाऊ माँसाहेब, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अतिथींच्या हस्ते भगव्या ध्वजाचे ध्वजारोहन करून ह.भ.प.कृष्णा महाराज मोरे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला महाराजांच्या कीर्तनाला गावातील भजनी मंडळानी साथ देऊन कार्यक्रम उत्साहात साजरा केला.
जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय,बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष बबन ढेंबरे ,नागनाथ तुपसौदंर,लहूदास अटपळकर,भाऊसाहेब ढेंबरे,संजय अटपळकर,जालिंदर फड,बाळू धनगर,कुंडलीक अटपळकर,कैलास तुपसौदंर,बालाजी ढंगेकर,सतिष अटपळकर, डिंगाबर ढेंबरे,विठ्ठल अटपळकर,संतोष कोळेकर,हरिदास गित्ते, सोमनाथ खांडेकर,विलास तुपसौदंर, गजानन तुपसौदंर,कृष्णा अटपळकर,ओमकार धनगर,अशोक अटपळकर,प्रशांत ढेंबरे,बलभीम तुपसौदंर,वैजनाथ खांडेकर,संतोष मुंडे,नागनाथ खांडेकर,शिवतेज ढेंबरे,सुनील शिंदे,महादेव ढेंबरे,संतोष अटपळकर,गणेश तुपसौदंर,मुंजा गित्ते, गजानन अटपळकर,राहुल गित्ते,बिभीषण मुंडे यांनी अथक परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment