केज (प्रतिनिधी) ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस... वारकरी संत परंपरेचा कळसाध्याय ठरलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या बीजोत्सवाच्या कार्यक्रमाची श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे संस्थानचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी सुरू आहे .
तालुक्यातील श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान,औरंगपूर येथे दि. 13 ते 20 मार्च दरम्यान संत तुकाराम महाराज बीजे निमित्त अखंड हरिनाम सप्ताह ,श्रीमद भागवत कथा व भव्य गाथा पारायण सोहळ्याचे आयोज संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संसाथापक अध्यक्ष ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. महाराष्ट्रात संत तुकाराम महाराज बीजेचा सोहळा देहू नंतर संत तुकोबाराय पावनधाम संस्थान, औरंगपूर येथे आयोजित करण्यात येतो.सदरील सोहळ्यास महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून लाखो भाविक दाखल होतात.
यावर्षीच्या संत तुकाराम महाराज बीजेच्या सोहळ्यास किर्तनकार संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज श्रीगुरू पुंडलिक महाराज देहुकर ,ह.भ.प.एकनाथ महाराज लोमटे, ह.भ.प.पंडित महाराज क्षिरसागर, ॲड.जयवंत महाराज बोधले, ह.भ.प.चंद्रकांत महाराज वांजळे,किर्तन केसरी अच्युत महाराज दस्तापुरकर, यांची किर्तनसेवा होणार आहे. शेवटच्या दिवशी दि.20 मार्च रोजी काल्याचे किर्तन ह.भप. महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचे होईल.
सप्ताह काळात येणार्या भाविकांना दिवस-रात्र महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
अन्नदानासाठी लाडेगाव ग्रामस्थ, जवळबन ग्रामस्थ,आवसगाव व दिपेवडगाव ग्रामस्थ, माजी जिल्हा परिषद सदस्य कै. कल्याणराव काकडे यांच्या स्मरणार्थ अशोक कल्याणराव काकडे , भाजपा नेते अक्षय नंदकिशोर मुंदडा, ॲड.दिनेश दत्तात्र्य मुळे, श्रीमती तारामती ज्ञानोबा थोरात, कै.शंभु अप्पाराव तपसे यांच्या स्मरणार्थ राजेंद्र शंभु तपसे, राजेगावच्या पल्लवी ज्ञानोबा जाधव यांनी व्यवस्था केली आहे. शेवटच्या दिवशी महाप्रसादाची व्यवस्था उद्योजक नामदेवराव इंदरराव गोरे, सुभद्रा इंडस्ट्रीज, पुणे यांनी केली आहे.
संत तुकाराम महाराज बीजेची जय्यत तयारी संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संसाथापक अध्यक्ष ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगपूर, भाटूंबा, लाडेगाव, तांदळवाडी, जवळबन, सनगाव, चनई, कोद्री, कानडीबदन,सावळेश्वर, वाकडी, कौडगाव, सोमनाथ बोरगाव, होळ,उंदरी, नायगाव, देवळा, केकतसारणी, बनसारोळा, सौंदणा, इस्थळ, लासरा, घरगाव,रांजणी, शिराढोण, आनेगाव, दिपेवडगाव,आपेगाव, सोनवळा, बोरीसावरगाव, धानोरा, तटबोरगाव, गोटेगाव, माळेगाव, सुरडी, धनेगाव, आनंदगाव, सारणी, हिवरा, शिरपुरा, सातेफळ,कळमअंबा,आणि चंदनसावरगाव येथील भाविक तयारी करत आहेत. संत तुकाराम महाराज बीजोत्सवाच्या सप्ताह कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री क्षेत्र संत तुकोबाराय संस्थानचे संस्थापक अध्यक्ष तथा अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्त्री यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment