परळी वैजनाथ (प्रतिनिधी )- परळी शहरातील जयहिंदनगरमध्ये ९ ते १० मार्चच्या मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी केली. घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी सोन्याचे दागिणे व रोकड असा ऐवज चोरून नेला. संभाजीनगर ठाण्यात या प्रकरणी अज्ञातांविरूध्द गुन्हा नोंद झाला.
परळी शहरातील जयहिंदनगरमध्ये राहणाऱ्या संगीता लक्ष्मण गायकवाड या ९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील सोमेश्वरनगर येथे राहणाऱ्या त्यांच्या जावेकडे गेल्या होत्या. नंतर रात्री त्या तिकडेच मुक्कामी थांबल्या. या दरम्यान त्यांचे कुलूप बंद घरफोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत सोन्याची बोरमाळ, व इतर दागिणे तसेच काही नगदी रक्कम असा ७३ हजार ६०० रूपयांचा ऐवज लंपास केला. १० मार्च रोजी हा प्रकार लक्षात आल्यानंतर संगीता गायकवाड यांनी संभाजीनगर ठाण्यात फिर्याद नोंदवली. पोलिस अधिक तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment