Wednesday, March 9, 2022

राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत कु.सान्वी सचिन सौंदळे सुवर्ण पदकाची मानकरी.बेंगलुरू येथील राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी निवड.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)परळीची सुकन्या कु.सान्वी सचिन सौंदळे हीने राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत यश मिळवत सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
   27वी अॅक्रोबॅटीक्स व 21वी एरोबिक जिम्नॅस्टीक राज्य अजिंक्य स्पर्धा जळगांव येथे दि.5 मार्च 22 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या यास्पर्धेत महाराष्ट्रातील अॅक्रोबॅटीक्स व एरोबिक जिम्नॅस्टिक खेळाडूंची निवड करण्यात आली होती.
   सदरील स्पर्धेत परळीची सुकन्या सध्या औरंगाबाद येथे सहावीत शिक्षण घेणारी कु.सान्वी सचिन सौंदळे हीने सुवर्णपदक मिळवून बेंगलुरू येथील राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.
 सान्वी ही कै.अरविंद सौंदळे व जी.एस.सौंदळे गुरूजी यांची नात असून सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक चेतन सौंदळे यांची पुतणी आहे.
   सान्वी हीने जिम्नॅस्टिक सारख्या खेळात मिळविलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल तीचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतूक केले जात असून तिला राष्ट्रीय स्पर्धेच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment