Thursday, March 10, 2022

पाली जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा.पालीची जि.प.शाळा पत्रकार संघ दत्तक घेणार ;- वैभव स्वामी



 बीड (प्रतिनिधी) पाली येथील जिल्हा परिषदेची माध्यमिक शाळा मुख्याध्यापक लाड सर यांच्या कुशल नेतृत्वाखाली शैक्षणिक प्रगती करत आहे. या शाळेमध्ये आधुनिक प्रयोगशाळा उभारली जावी, यासाठी शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर पत्रकार संघ प्रयत्न करून शाळा प्रगतीसाठी दत्तक घेत असल्याचे पत्रकार संघाचे मराठवाडा विभाग अध्यक्ष वैभव स्वामी यांनी जाहीर केले.
बीड तालुक्यातील पाली माध्यमिक जिल्हा परिषद शाळा येथे 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या टाकाऊ पासून टिकाऊ विविध प्रयोगांचे सादरीकरण संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाली शाळेचे मुख्याध्यापक लाड सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाच्या महिला उपाध्यक्ष आयेशा शेख मॅडम तसेच पाली गावचे सरपंच दशरथ आप्पा राऊत ,उपसरपंच विजयाताई नवले त्यांचे पती लक्ष्मण तात्या नवले हे होते. याप्रसंगी विविध विज्ञानाच्या संकल्पनेचे रांगोळीतून रेखाटन करणाऱ्या विद्यार्थिनींना आणि विविध प्रयोगांचे सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांतून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ येणाऱ्या विद्यार्थ्यांना पत्रकार संघाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. त्याच बरोबर यावर्षी दहावी परीक्षेत जो विद्यार्थी शाळेमधून सर्वप्रथम येईल त्याचा विशेष सन्मान देखील करण्यात येणार आहे. पाली जिल्हा परिषद शाळेच्या सर्वांगीण विकासाबरोबरच पाली या गावाच्या विकासासाठी देखील पत्रकार संघाच्या माध्यमातून गाव दत्तक घेऊन विकासाच्या विविध योजना राबवण्यात येतील असे यावेळी पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी जाहीर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आघाव सर यांनी  केले. काब्दे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान प्रयोग सादर करण्यात आले. सदरील कार्यक्रम करुणा महामारी नंतर पहिल्यांदाच तळेकर सर, रूपदे सर,श्रीमती  पि.टी.बनसोडे मॅडम,मुंडे मॅडम, एल.आर.बनसोडे मॅडम, खाडे मॅडम,मुळे मॅडम,वाकचौरे मॅडम व शालेय इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम अगदी उत्तम रीतीने प्रकारे पार पडला.

No comments:

Post a Comment