Friday, March 11, 2022

न्यायिक क्षेत्राला उंची देण्याचा प्रयत्न अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पूर्ण करणार - अध्यक्ष वसंतराव साळुंके.

* लग्नात झाला नाही असा नागरी सत्कार बीड वकील संघाने केला गौरवोद्गार. 

बीड (प्रतिनिधी) वकिलांना पेन्शन आणि ज्युनियर वकिलांना मानधन देण्यासाठी अडवोकेट वेल्फेअर फंड ॲक्ट प्रत्यक्षात अमलात आणून तो शासन दरबारी मंजूर करण्यास भाग पाडण्यासाठी प्रयत्न करणार असून न्यायिक क्षेत्राला सर्वोच्च उंची देण्यासाठी काही करता आले तरच बार कौन्सिलचे अध्यक्षपद सार्थकी लागले आणि आपण विश्वासाने टाकलेली जबाबदारी पूर्ण करता आली असे मला वाटेल.त्यासाठी आपले प्रेम, विश्वास कायम पाठीशी राहील अशी अपेक्षा व्यक्त करत बार कौन्सिलचे नूतन अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ वसंतराव साळुंके यांनी माझ्या लग्नात झाला नाही इतका दैदीप्यमान नागरी सत्कार बीड जिल्हा वकील संघाने केल्याबद्दल मनस्वी आभार व्यक्त केले.
बीड जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणामध्ये गुरुवार दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे नूतन अध्यक्ष बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र औरंगाबाद खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञ एडवोकेट व्ही डी साळुंके यांचा बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने भव्य दिव्य नागरी सत्कार करण्यात आला. शानदार फेटा बांधून, गुलाब पुष्पहार, शाल, श्रीफळ आणि बीड जिल्ह्याच्या इतिहासाची साक्ष देणारे स्मृतिचिन्ह त्याच बरोबर गौरव प्रमाणपत्र देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सदानंद राऊत, उपाध्यक्ष एडवोकेट संजय जटाळ, सचिव एडवोकेट नरेंद्र कुलकर्णी, सहसचिव ऍडव्होकेट सय्यद झोहेब अली कोषाध्यक्ष एडवोकेट गणेश तावरे, ग्रंथपाल सचिव एडवोकेट तेजस नेहरकर, महिला प्रतिनिधी एडवोकेट विशाखा जाधव, कार्याध्यक्ष एडवोकेट प्रवीण राख यांनी वकील संघाच्या वतीने हा सत्कार सोहळा संपन्न केला.
या नागरी सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत महाजन साहेब यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हा सरकारी अभियोक्ता एडवोकेट अजय राख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट सदानंद राऊत यांनी केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र एडवोकेट व्ही डी साळुंके यांना बार कौन्सिलच्या सर्वोच्च पदावर मिळालेली संधी बीड जिल्ह्याची शान वाढवणारी ठरली आहे. साहेब आपल्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ मिरवण्यासाठी नव्हे तर न्यायव्यवस्थेला आणखीन उंची देण्यासाठी निश्चितपणे सार्थकी लावतील असा विश्वास आहे.बीड जिल्हा न्यायालय अंतर्गत पार्किंगची व्यवस्था, अद्यावत कॅन्टीन उभारूली पात्र अवाजवी भाडे आकारल्यामुळे कॅन्टीन तीन वर्षापासून धूळखात पडून आहे, वकिलांना आजही झाडाखाली बसावे लागते त्यांना हक्काची जागा मिळावी आदी समस्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली. याप्रसंगी एडवोकेट प्रभाकर आंधळे, एडवोकेट हेमाताई पिंपळे, एडवोकेट बी एफ चव्हाण एडवोकेट एस डी जगताप, एडवोकेट विवेकानंद सानप यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा सरकारी वकील अजय राख आपल्या मनोगतात म्हणाले, कुटुंबात कोणीही वकील नसताना थेट बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले ज्येष्ठ विधिज्ञ एडवोकेट साळुंके एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्याबद्दल प्रत्येकांच्या मनात एक आपलेपणाची भावना असून ती कायम राहील.
तर कार्याध्यक्ष एडवोकेट प्रवीण राख यांनी अभिनंदन पत्राचे वाचन केले. या प्रसंगी सत्कार मूर्ती बार कौन्सिलचे अध्यक्ष एडवोकेट व्ही डी साळुंके पुढे बोलताना म्हणाले की, प्रत्येक न्यायालयाच्या परिसरात बार असोसिएशनला कोर्टाने किमान दहा गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी, आम्ही आमच्या प्रयत्नातून त्या जागेत वकिलांसाठी अद्यावत बैठक व्यवस्था व इतर सुविधांसाठी प्रयत्न करू. ज्यामुळे वकिलांच्या यांच्या अनेक प्रश्नांना कायमचा न्याय मिळेल. बार कौन्सिलला रजिस्टेशन शिवाय दुसरा कोणताही आर्थिक सोर्स नाही. तरीसुद्धा बार कौन्सिल मुंबईत लवकरच आपल्या स्वतःच्या जागेत अद्यावत कार्यालयासह विश्राम ग्रहाची व्यवस्था करणार आहे. ज्यामुळे महाराष्ट्र व इतर ठिकाणाहून येणार्‍या वकिलांची राहण्याची व इतर अडचणींची व्यवस्था मार्गी लागेल. चांगल्या वकिलां मधून योग्य न्यायाधीश देण्याचा प्रयत्न बार कौन्सिल करत असून ज्युडिशियल एज अ करियर हा उपक्रम हाती घेतला आहे. येणाऱ्या कार्यकाळात वकील आणि न्यायाधीश यांच्या हितासाठी चांगल्या योजना राबवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे न्यायिक क्षेत्रामध्ये बीड जिल्हा सक्षम असून महाराष्ट्राच्या इतर कोर्टात देखील बीड जिल्ह्यातील वकील बांधव आपले कर्तुत्व सिद्ध करत आहेत.त्यामुळे बीड जिल्ह्याचा अभिमान वाटतो. या सर्वोच्च पदावर विराजमान होताना अध्यक्षपद वाकून नव्हे तर ताठ मानेने मिळाले याचा निश्चित आपल्या पाठबळामुळे गौरव वाटतो आणि राहील. माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बीड जिल्ह्याचे नाव उंचावण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास आपल्या मनोगतातून व्यक्त केला. अध्यक्षीय समारोपात जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत महाजन साहेब म्हणाले, बार कौन्सिलचे नूतन अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ एडवोकेट व्ही डी साळुंखे यांनी न्याय विभागाच्या सर्व क्षेत्रात केलेले कार्य निश्चित गौरवास्पद आहे. त्यांनी बारा हजारांपेक्षा अधिक केसेस चालवल्या. त्यापैकी दीडशेपेक्षा अधिक केसेस या न्याय निवडण्यासाठी वापरल्या जातात. ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. त्यांनी समाजाप्रती स्वीकारलेले दायित्व ते निश्चितच पार पाडतील. वकील संघाच्या विविध समस्यांना न्याय देण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल. माजलगाव डोम चा प्रश्न देखील लवकरच मार्गी लावू असेही अभिवचन दिले.
 कार्यक्रमाचे आभार वकील संघाचे उपाध्यक्ष एडवोकेट संजय जटाळ यांनी मानले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन एडवोकेट नितीन वाघमारे आणि एडवोकेट संगीता धसे यांनी केले. या कार्यक्रमाला बीड जिल्हा वकील संघाचे सर्व सदस्य तसेच जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणे वकील बांधव,वकील भगिनी, न्यायालयीन कर्मचारी, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, पत्रकार, हितचिंतक, बार कौन्सिलचे अध्यक्ष साळुंके साहेब यांच्या वर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नागरी सत्काराच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष प्रविण राख यांच्यासह एडवोकेट अजय तांदळे, एडवोकेट विलास जोशी, एडवोकेट प्रभाकर आंधळे, एडवोकेट अनिल तिडके, एडवोकेट सुरेश वडमारे, एडवोकेट अविनाश गंडले, एडवोकेट रतिलाल भंडारी सह सर्व वकील बांधव आणि भगिनी यांनी एक दिलाने एकजुटीने हा कार्यक्रम यशस्वी केला.

 सत्काराचा वर्षाव 
बीड जिल्हा वकील संघा सोबतच जिल्ह्यातील शिरूर कासार, माजलगाव, वडवणी व इतर तालुक्यातील तालुका वकील संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी यांच्यासह एडवोकेट अविनाश गंडले यांनी भारतरत्न, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अप्रतिम प्रतिमा भेट देऊन सत्कार केला.बीड जिल्हा क्रिकेट संघाच्यावतीने कर्णधार एडवोकेट अविनाश गडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्कार केला. जाणीव प्रतिष्ठान तर्फे एडवोकेट विवेकानंद सानप, तर ज्येष्ठ विधिज्ञ एडवोकेट कालिदास थिगळे, एडवोकेट देशमुख, अडवोकेट विजयकुमार देशपांडे, एडवोकेट रतिलाल भंडारी, एडवोकेट अमृत पाठक, महिला एडवोकेट हेमाताई पिंपळे, एडवोकेट वर्षा दळवी, एडवोकेट कदम, एडवोकेट जायभाय, एडवोकेट सारिका जोशी, एडवोकेट दिनेश हंगे, एडवोकेट राम दहिवाळ, एडवोकेट जयंतराव, एडवोकेट उद्धव रासकर, एडवोकेट अरविंद काळे, एडवोकेट महादेव तुपे, एडवोकेट मिसाळ, एडवोकेट साबळे, एडवोकेट चौरे, एडवोकेट सालपे, बीड जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष कुलकर्णी, पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी आदींनी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, फेटे बांधून कौतुकाचा वर्षाव केला.

No comments:

Post a Comment