*या नियमबाहय लाभार्थी चा निधी पात्र दिव्यांग बांधवाना वर्ग करा.अन्यथा येत्या 14 तारखे पासून अमरण उपोषण.
परळी वैजनाथ (प्रतीनिधी ) महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडून राज्यात संजय गांधी निराधार योजना आणि इंदिरा गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना राबविल्या जातात यात केवळ आणि केवळ 2002 ते 2012 च्या नियमबाहय डीआरडी यादीत नांव समाविष्ट असल्यामुळें अनेक सदन आणि समर्थ नागरिक या योजना चा लाभ घेत आहेत त्यामुळे जे खरे पात्र नि:समर्थ दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना सरसकट 1000 रूपये मानधनावर उपजिविका भागवावी लागत आहे त्यामुळे या नियमबाह्य डीआरडी यादीतील परळी शहर व तालुका तील सर्व समर्थ व सदन लाभार्थी कमी करून पात्र नि:समर्थ दिव्यांग लाभार्थी बांधवाच्या खात्यात वर्ग करण्यात यावा अशा आशयाची लेखी मागणी अखिल भारतीय दिव्यांग हित कारणी सभेचे च्या वतीनें परळीचे तहसिलदार तथा तालुका सचिव संजय गांधी निराधार योजना यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे अन्यथा येत्या 14 तारखे पासून बेमुदत अन्न त्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे
No comments:
Post a Comment