
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिराचे उद्घाटन मिरवट येथे झाले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतूनच व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. नाती जोपासण्याची शिकवण यासारख्या शिबिरातूनच मिळते. म्हणून शिबिरात मन लावून काम करा, असे विचार मांडले.
याप्रसंगी एन.एस.एस. जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.माधव रोडे यांनी निरोगी मनाचा सकारात्मक दृष्टीकोन जोपासणे महत्त्वाचे आहे. त्याचीच जोपासना विद्यार्थिंनी करावी. म्हणजे जीवन आनंददायी होईल, असे विचार मांडले. संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख यांनी ग्रामीण भारताच्या समस्या जाणून घेऊन निराकरण करण्यास राष्ट्रीय सेवा योजना उपयुक्त ठरते, असे सांगितले. तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जीवनात अनेक संधी येतात. त्या संधीचा योग्य तो फायदा घेतला पाहिजे, अशी आपली भूमिका प्राचार्य डॉ.एल.एस.मुंडे यांनी मांडली.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व प्रतिमा पूजनाने झाली. व्यासपीठावर सरपंच राधा साबळे, उपसरपंच रामेश्वर इंगळे, सदस्य गोविंद बोंबले, दत्ता पवार, धुराजी साबळे, मुजा इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.पी व्ही .गुट्टे, सह कार्यक्रमाधिकारी प्रा.आर.एल.जोशी, प्रा. रंजना शहाणे, प्रा. कल्याणकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. पी.व्ही. गुट्टे यांनी व सूत्रसंचालन माधुरी बडे हिने तर आभार प्रकटन प्रा.पी.एम. फुटके यांनी केले.
No comments:
Post a Comment