Monday, March 21, 2022

बीड नगर परिषदेचे मूख्याधिकारी डाॅ. उत्कर्ष गूट्टे सह सहा जण निलंबित.गैरकारभाराची होणार चौकशी .




बीड (प्रतिनिधी) बीड येथील नगर पालिकेतील अनागोंदी कारभारावर ठपका ठेवत मुख्याधिकारी डॉ . उत्कर्ष गुट्टे , जिल्हा प्रशासन अधिकारी नीना अंधारे , पाणी पुरवठा अभियंता राहुल टाकळे , बांधकाम अभियंता योगेश हाडे , कर अधीक्षक सुधीर जाधव , कनिष्ठ रचना सहायक सलीम याकूब यांना निलंबित करण्यात आले आहे. आ . विनायक मेटे यांनी लक्षवेधी मांडल्यानंतर राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत.तसेच बीड नगरपालिकेच्या अमृत योजना, रमाई आवास योजना, इतर कामांबाबत चौकशीचेही आदेश देण्यात आले.

विधीमंडळात आमदार विनायक मेटे यांनी केलेल्या लक्षवेधी सूचनेवर चर्चा झाली . या चर्चेत शशिकांत शिंदे , सतीश चव्हाण व इतर सदस्यांनी सहभाग घेतला . नगरपालिका अंतर्गत नागरिकांना सुविधा मिळत नाहीत . अधिकारी व कर्मचारी हे कर्तव्यात कसूर करतात , तसेच लोकप्रतिनिधींनी बोलावलेल्या बैठकांना गैरहजर राहतात , असा आरोप आ . विनायक मेटे यांनी केला . यावर राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली . दरम्यान , नगरपालिका अंतर्गत गैरकारभाराच्या चौकशीसाठी समिती पुनर्गठित करण्यात येईल अशी घोषणा देखील तनपुरे यांनी केली आहे

No comments:

Post a Comment