Monday, March 21, 2022

संगमच्या ग्रामस्थानी मला सरपंचाची संधी दिल्यामुळे मी गावचा विकास करू शकले त्यामुळे हा आदर्श सरपंच पुरस्कार संगमवासियांचा- सौ.कोकाटे

परळी वैजनाथ (प्रतिनीधी)  सरपंच संघटनेच्या वतिने मी स्विकारलेला आदर्श सरपंच पुरस्कार हा तमाम संगम ग्रामस्थांचा असुन मला सरपंच पदावरुन गावचा विकास सर्वसामान्यांची सेवा करण्याची संधी दिल्याने हा पुरस्कार मिळाला असल्याचे संगमच्या माजी सरपंच सौ वत्सलाबाई कोकाटे यांनी सांगितले.
   संगमच्या माजी सरपंच सौ. वच्छालाबाई वैजनाथराव कोकाटे यांना दि.20 मार्च रोजी माऊली संकुल सभागृह सावेडी,अहमदनगर येथे आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी आमदार निलेशजी लंके,पद्मश्री राहीबाई पोपेरे,आदर्श सरपंच  पोपटराव पेरे पाटील,एकनाथ ढाकणे ग्रामसेवक युनियन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, माधवराव पावसे सरपंच संवासंघ अध्यक्ष बाबासाहेब पावसे सरपंच युवा नेतृत्व,रोहित पवार सरपंच शो
सोशल मिडिया प्रमुख,बीड जिल्हा नियोजन समिती सदस्य वैजनाथराव सोळंके,माजी उपनगराध्यक्ष रविंद्र परदेशी, माजी नगरसेवक जालिंदर नाईकवाडे ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे मराठवाडा विभागीय अध्यक्ष यांच्या उपस्थितीत देण्यात आला.यावेळी बोलताना सौ.कोकाटे म्हणाल्या की,महाराष्ट्र राज्याचे न्याय मंञी तथा बीड व परभणी  जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब परळी न.प.गटनेते वाल्मीकअण्णा कराड व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली संगम गावात अनेक विकास योजना राबवल्या.गावात विकास योजना राबवण्यासाठी ग्रामस्थांचे विशेषतः महिलांचे मोलाचे सहकार्य लाभले.या सहकार्यामुळेच मी गावात अनेक विकास योजना राबवू शकले. यात मुख्य रस्त्याची विकासकामे,महादेव मंदिर येथे सभागृह,बौध्द विहार सभागृह,गावात दहा लाख रुपयांचे हायमास्ट दिवे बसवुन संपुर्ण गाव लखलखीत केले.संरक्षण भिंत,स्मशानभुमी कंपाऊंड वॉल,शाळा रंगरंगोटी व दुरुस्ती,सिंमेट रस्ते,पेवरब्लॉक,पाणी अडवा पाणी जिरवा यासाठी जागोजागी शोष खड्डे,गावातील रस्त्यावर वृक्षारोपण,नाना- नानी पार्क,स्मशानभुमी बांधकाम,प्रत्येक वॉर्डात पिण्याच्या पाण्यासाठी पाणी टाकी या विकास कामाबरोबरच गावामध्ये शिवजयंती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,बौध्द पौर्णिमा अशा प्रसंगी अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेवुन कोरोना काळात औषध फवारणी,मास्क वाटप असे उपक्रम राबवण्यात यशस्वी झाल्याने संगम गावला आदर्श गाव म्हणुन दर्जा मिळवुन देण्यात यशस्वी झाले व पुढील काळात संगमच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.संगमच्या कार्यतत्पर माजी सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त होताच परळीतील राजकिय,सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment