परळी वैजनाथ (वार्ताहर) परळी येथील बस्वेश्वर नगर येथे महाशिवराञ या शुभ मुहूर्तावर खास मुलींसाठी वारकरी शिक्षण संस्थेचे उदघाटन रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व श्रीफळ वाढवून शुभकार्याला सुरूवात करण्यात आले या वेळी बोलतांना कोकाटे महाराज म्हणाले कि मुलींना आध्यात्मिक शिक्षण हे जवळ पास कुठेच नाही फक्त आळंदी येथेच आहे म्हणून मुलींना आध्यात्मिक शिक्षण मिळावे म्हणून परळी येथे किर्तन, भजन, गायण,मृदंग व शिस्ञीय गायण,व वारकरी सांप्रदायिक भजन काकडा,हरिपाठ श्रीमद्भगवदगीतेची संहिता या व्दारकाधिश आध्यात्मिक गुरूकुलात मिळनार आहे म्हणून ज्या ज्या मुलींना आध्यात्मिक शिक्षण घ्यायचे आसल्यास संपर्क साधावा आसे कोकाटे महाराज उदघाटन प्रसंगी बोलतांना म्हणाले या कार्यक्रमास चंद्रकांत कळसे सर,ह.भ.प.राजेभाऊ महाराज मांडवेकर,ह.भ.प.रूक्षराज महाराज अंधळे, ह.भ.प.अशोक महाराज कराळे, वसंतराव राठोड सर,कवि कांबळे सर,ह.भ.प.दत्ता महाराज गडदे,ह.भ.प.भरत महाराज, माऊली मंडळाच्या अध्यक्षा निर्मलाताई नागरगोजे, ह.भ.प.जोशी महाराज, भावसार दादा,ह.भ.प.साखरे महाराज यांच्या सह अनेक भाविक उपस्थित होते या सर्व मान्यवरांचे स्वागत व्दारकाधिश गुरूकुलाच्या अध्यक्षा चंदाताई लोखंडे यांनी सर्वाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर आभार राजेभाऊ महाराज यांनी मानले
No comments:
Post a Comment