बीड:-- कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नियमाचे पालन करण्याच्या सक्तीच्या सूचना जिल्हा प्रशासनाने कितीही दिल्या असल्या तरी लोक मात्र नियमाचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. आज एसबीआय बँकेसमोर नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. नागरीकांमध्ये कसल्याही प्रकारचे अंतर दिसून आले नाही. या गर्दीकडे संबंधीत विभागाने दुर्लक्ष करता कामा नये. लोकांनीही नियमाचे पालन करायला हवे. या बँकेसह जालना रोडच्या इतर बँकेतही सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाला असल्याचे दिसून आले. कोरोनाची महामारी रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य ठोस पाऊले उचलली जात आहेत. शासकीय कार्यालयासह बँकामध्ये नागरीकांनी गर्दी करू नये. व्यवहार करत असतांना अंतर ठेवून व्यवहार करावेत अशी सूचित करण्यात आले असले तरी नियमाचे मात्र पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. आज सकाळपासून जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर असलेल्या एसबीआय बँकेत ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती ही गर्दी नियमाचे उल्लंघन करणारी होती. संबंधीत नागरीकांनी कसल्याही प्रकारचे अंतर राखलेले नव्हते. तसेच जालना रोडसह इतर बँकेतही अशाच पद्धतीची गर्दी दिसून आली.
* जालना रोडची
एसबीआय बँक केली बंद.
जालना रोड लगत मसरत नगरमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह पेशंट सापडल्याने तो परिसर पुर्णत: बंद करण्यात आला. त्यासमोरच एसबीआय बँक असल्याने सदरील बँकेचा कामकाज आज सकाळपासून बंद करण्यात आले होते.
No comments:
Post a Comment