Friday, June 12, 2020

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांना करोनाची लागण.

* ना.धनंजय मुंडे साहेब यांच्या संपर्कात आलेल्यानी तसेच त्यांच्या पी.ए.च्या संपर्कात आलेल्यानी 28 दिवस घरीच क्वाॕरनटाइन राहावे;- .जिल्हधिकारी राहुल रेखावार . 

बीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड चे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य  कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते.
5 जून रोजी परळीत जगतकर गल्लीतील एक महिला औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह  आढळून आली होती . त्यावेळी तिच्या कुटुंबियांच्या संपर्कात ना.धनंजय मुंडे देखील आले होते . मात्र मुंडे यांचा समावेश हायरिस्क गटात न करता लो रिस्क गटात करण्यात आला होता . त्यामुळे त्यांचे स्वब घेण्यात आले नव्हते . तर हायरिस्क गटातील लोकांचे स्वब निगेटिव्ह आढळून आले होते . त्यानंतर सोमवारी मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचे उदघाटन देखील केले होते . आता मुंडे यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली हे अद्याप स्पष्ट नाही  .

No comments:

Post a Comment