Thursday, May 7, 2020

विधीमंडळात पुन्हा रंगणार बहिण - भावाचा सामना मा.पंकजा मुंडे लवकरच विधीमंडळात दिसणार भाजपाकडून उमेदवारी निश्चित?


* परळी तहसील मधून कागदपत्रांची जमवाजमव, परळीला मिळणार तिसरा आमदार

बीड / परळी वैजनाथ ;- माजी मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून परळी तहसीलमधून कागदपत्रांची जमवाजमव सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून पंकजा यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याचं बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पंकजा यांनी गोपीनाथ गडावरील मेळाव्यात पक्षाच्या कोअर कमिटीचा राजीनामा देत नाराजी व्यक्त केली होती. या निवडणुकीत पक्षाने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. त्यामुळे परळीला आणखी एक आमदार मिळणार असून, विधीमंडळात पुन्हा मुंडे बहिण-भावात राजकीय सामना रंगताना दिसू शकेल. फक्त भूमिकांची अदलाबदल झालेली पहायला मिळू शकते. याबाबत चर्चा असली तरी पंकजा मुंडे यांनी मात्र तूर्तास याचा इन्कार केला आहे.

No comments:

Post a Comment