बीड(दि.१७)- बीड जिल्ह्यात कोरोना लागण झालेले दोन रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासन आणखी सतर्क झाले आहे. खबरदारी म्हणून ज्या भागातील रुग्ण कोरोना पॉझीटिव्ह आढळून आलेत ती गावे व परिसर अनिश्चित कालावधीसाठी पूर्ण वेळ बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी काढले आहेत.
गेवराई व बीड तालुक्यातील इटकुर या गावापासून ३ कि.मी. परिसरातील(गेवराई तालुक्यातील इटकुर,हिरापुर,शिंपेगांव, कुंभारवाडी व बीड तालुक्यातील खामगांव,नांदुर हवेली व पारगांव जप्ती) हा परिसर Containment zone म्हणून घोषित करण्यात येत आहे . Containment zone नंतर पुढील ०४ कि.मी.परिसरातील(गेवराई तालुक्यातील लोळदगांव,अंकोटा,शहाजानपूर चकला,मादळमोळी, कृष्णनगर,पाडळसिंगी, टाकळगांव व बीड तालुक्यातील आहेरचिंचोली,कामखेडा, पेंडगांव,हिगंणी हवेली,तांदळवाडी हवेली व पारगांव शिरस हि गांवे Buffer zone म्हणून घोषित करण्यात येत आहेत.वरील सर्व गांवे व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात आला आहे.
माजलगांव तालुक्यातील हिवरा येथे कोरोना विषाणू लागण (COVID-१९ Positive) झालेला रुग्ण आढळुन आलेला आहे.त्याअर्थी बीड जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन पुढील प्रमाणे फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९ ७३ चे कलम १४४ नुसार माजलगांव तालुक्यातील हिवरा बु.या गावापासून ३ कि.मी. परिसरातील( माजलगांव तालुक्यातील हिवरा बु.,गव्हाणथडी,काळेगांवथडी,डुब्बाथडी व भगवाननगर ) हा परिसर Containment zone म्हणून घोषित करण्यात येत आहे . Containment zone नंतर पुढील ०४ कि.मी. परिसरातील(माजलगांव तालुक्यातील राजेगांव , सुर्डी,महातपुरी,वाघोरा,व वाघोरातांडा) हि गांवे Buffer zone म्हणून घोषित करण्यात येत आहेत.वरील सर्व गांवे व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पुर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत.
No comments:
Post a Comment