अंबाजोगाई : ( प्रतिनीधी ) १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपा वरून एका तरुणावर अंबाजोगाई शहर ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
सतीश व्यंकट तरकसे (रा. रायगड नगर, अंबाजोगाई) असे त्या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे आणि सतीशचे प्रेमसंबंध होते. सतीशने तिला वेळोवेळी लग्न करण्याचे आमिष दाखविल्याने ते नेहमी भेटत आणि त्यांच्यात मोबाईलवरून संभाषणदेखील होत असे. (दि. १० मे) रात्री ११.३० वाजता सतीशने फोनवर बोलत असताना पिडीतेला माझ्यासोबत लग्न कर नाहीतर मी मरतो, मला आत्ताच भेटायला ये म्हणून बोलाविले. त्याने जीवाचे बरेवाईट करून घेऊ नये म्हणून पिडीत सतीशच्या घरी गेली. तिथे सतीशने तिच्यावर अत्याचार केला. पहाटे तीन वाजता पिडीता घरी परतल्याने तिच्या आजीला संशय आला. आजीने याबाबत विचारले असता पिडीतेने घडलेल्या घटनेबाबत तिला सांगितले. दोन महिन्यानंतर काल रविवारी तिच्या वडिलांनाही या प्रकाराबाबत बाहेरून कळाले. त्यानंतर पिडीतेने वडील आणि आजीसोबत अंबाजोगाई शहर ठाणे गाठले आणि अत्याचाराची तक्रार नोंदविली.
दोन दिवसांची पोलीस कोठडी :
गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी सतीश तरकसे यास अटक केली. सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक दहिफळे करत आहेत.
No comments:
Post a Comment