Sunday, May 17, 2020

महाराष्ट्रातलं लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवलं !

मुंबई, दि. १७ – कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढवून ३१ मेपर्यंत केला आहे. केंद्र सरकारच्या गाईडलाईन प्राप्त झाल्यानंतर लॉकडाऊनसंदर्भातल्या नियमावलीत अजून स्पष्टता येणार आहे. लॉकडाऊनचा हा चौथा टप्पा असणार आहे. चौथ्या टप्प्याचा अध्यादेश महाराष्ट्र सरकारने आज जारी केला आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज नव नवे विक्रम करत असली तरी राज्यात सलग तिसऱ्यांदा दिवसाला ५०० पेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतत असल्याचा दिलासाही मिळत आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ३० हजारांपार गेली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिगचे नियम काटेकोरपणे पाळून घरीच रहा सुरक्षित रहा, असे आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment