Sunday, May 31, 2020

ज्याच्यावर दारूबंदीची जबाबदारी तोच दारूच्या नशेत तर्रर्र !


* बोबडेवाडी येथे स्वतः सरपंचानेच दारू पिऊन आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.

केज(दि.३१)- गावात ज्यांनी दारू बंदी करायची जबाबदारी आहे. अशा सरपंच महोदयांनी स्वतः दारू पिवून मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी केज तालुक्यातील एका सरपंचावरच गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे गावात आणि परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

गावात दारू बंदी, गुटखा बंदी आणि नशबंदी राबवून गाव तंबाखू मुक्त व नशबंदी सारखी विविध योजना राबवून गावाचा विकास करावा अशी अपेक्षा गावच्या सरपंचां कडून असते. तसेच जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस प्रशासन यांच्या सूचना व आदेश यांचे गाव पातळीवर पर्यंत राबवून कार्यवाही करण्याचे काम करावे लागते. मात्र केज तालुक्यातील बोबडेवाडी येथील संतोष क्षिरसागर या सरपंच महोदयांनी दिनांक ३० मे रोजी सायंकाळी ७:३० वाजता सुमारास बोबडेवाडी येथे महादेव मंदीराकडे जाणारा रोडवर कोरोना विषाणू रोगाचा संक्रमणाचा फैलाव होवु शकतो. हे माहीत असताना देखील विनाकारण दारुच्या नशेमध्ये रोडवर फिरुन मा. जिल्हा दंडाधीकारी बीड यांनी जारी केलेला संचारबदीचे उल्लंघन केले. तसेच सार्वजनिक सुरक्षततेच्या दृष्टीकोणातुन मानवी जीवीतास व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करुन संसर्ग पसरविण्याचे घातक कृती करुन कोरोना विषाणु पसरविण्यास पोषक वातावरण तयार केले. या मध्यधुंद सरपंचाच्या मर्कट लीलांची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना कळविताच पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनकर पुरी यांच्या फिर्यादी वरून पोलीस स्टेशन केज गु.र.नं. २०३/२०२० भा.दं.वि. कलम १८८, ३६९, २७० सह  महाराष्ट्र पोलीस कायदा १७ सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापण कायदा २००५ चे कलम ५१(ब) व महाराष्ट्र कोवीड -१९ उपाय योजना २०२० चे ११ कलम व ८५ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment