*ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांची माहिती
परळी वैजनाथ ;(प्रतिनिधी) श्री उत्तरेश्वर गुरू माऊली संगित विद्यालय व अ.भा.वारकरी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी विसाव्या शतकातील महान संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त प्रसिद्ध गायक सुभाष शेप यांची निवड करण्यात आल्याची माहिती अ.भा.वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी दिली.
श्री उत्तरेश्वर गुरू माऊली संगित विद्यालय व अ.भा.वारकरी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी विसाव्या शतकातील महान संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त प्रतिवर्षी पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. विविध क्षेत्रातील मान्यवरांना आतापर्यंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. यावर्षी संगीत क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे स्वररत्न ऑर्केस्टॉचे संचालक गायक सुभाष शेप यांचीया पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सुभाष शेप विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून आजपर्यंत गायन करत आलेले आहेत. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे त्यांचे जाहीर कार्यक्रम बंद असले तरीही त्यंाचे गायन मात्र बंद झालेले नाही. या दोन महिन्यात त्यांनी दररोज दोन तास फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन केले आहे. आजपर्यंत सुभाष शेप यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. यावर्षीचा संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार माझ्यासाठी सर्वोत्तम असल्याची भावना सुभाष शेप यांनी भ्रमणध्वनीवरून दै.मराठवाडा साथीच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली. सदरील पुरस्कार लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून दि.5? जुन रोजी संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दिला जाणार आहे. अगदी मोजक्या मान्यवरांची उपस्थिती या सोहळयास लाभणार आहे. ज्यामध्ये अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे शास्त्री, मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सामाजिक कार्यकर्ते डॉ.राजाराम मुंडे हे मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती अ.भा.वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी सांगितले. पुरस्कारासाठी सुभाष यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment