Wednesday, May 20, 2020

बीड जिल्ह्यातील २४ हजार १८१ बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात जमा होणार प्रत्येकी २ हजार रुपये !

* शासन नोंदणीकृत बांधकाम कामगारांची उर्वरित यादी पाठवण्याचे काम सुरू

* अर्थसह्यासाठी कागदपत्र जमा करण्याची आवश्यकात नाही.

* दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडू नका.

बीड, दि.२०:शासनाने  बीड जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगरांसाठी प्रत्येकी २ हजार रूपये अर्थसाह्य महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळामार्फत देण्यात येणार असल्याचे कामगार आधिकरी एस.पी.राजपूत यांनी कळवले आहे.
संपूर्ण देश व महाराष्ट्रात सुरू असलेल्या कोविंड १९ विषाणूच्या प्रदूर्भावामुळे लॉकडाऊनची परिस्थिती उद्वभवली असल्याने जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील व्यवसाय व कामगार कर्मचार्यांवर आर्थिक परिणाम झाला आहे. बांधकाम कामगारांना या अर्थ सह्यामुळे दिलासा दिला असून त्यानुसार जिल्ह्यातील नोंदणी व नूतनीकरण जीवित (सक्रिय) असलेल्या बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रास्फर अर्थात डिबीटी पद्धतीने २ हजार रुपये आर्थसाह्य जमा करण्यात येणार आहे. जिल्हा कामगार कार्यालयामार्फत आजपर्यंत २४ हजार १८१ इतक्या बांधकाम कामगारांची यादी मंडळाच्या मुंबई मुख्यालयात पाठविण्यात आली आहे. उर्वरित यादी पाठविण्याचे काम सुरू आहे. या अर्थसह्यासाठी कुठलाही अर्ज भरण्याची अथवा कागदपत्र या कार्यालयात जमा करण्याची, कुठल्याही अनधिकृत व्यक्तीस भेटेण्याची आवश्यकात नाही. दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीच्या भूलथापांना बळी न पडता त्यांची संबंधीत पोलिस स्टेशनला तक्रार करावी. याशिवाय अर्थसह्याची रक्कम परस्पर बँक खात्यात जमा होणार असल्याने चौकशी करता कार्यालयात गर्दी करू नये आणि लाॅकडाऊन नियमाचे पालन करावे, अशा सूचना कामगार अधिकारी यांनी दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment