पुणे:मान्सूनच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी राज्यात आगामी आठवड्यात तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार आहे. राज्यातील अनेक भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले. देशभरात अनेक भागांत कमाल तापमान चढे राहणार असल्याचेही सांगण्यात आले.
मराठवाड्यात ३० मेपर्यंत उष्णतेची
मराठवाड्यात येत्या ३० मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी जास्त राहील. चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ४६.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
विदर्भ, मराठवाडातील शहरांतील तापमान :
औरंगाबाद ४१.७, नगर ४२.६, अकोला ४४.६, चंद्रपूर ४६.४, अमरावती ४५, नागपूर ४६, सोलापूर ४१.४, जळगाव ४३, उस्मानाबाद ४१.४, परभणी ४४, मालेगाव ४३.६ अंश सेल्सियस.
No comments:
Post a Comment