Thursday, May 21, 2020

परंड़ा.भुम.उमरगा आगारातुन बस-सेवा शुक्रवार 22-मे पासुन सुरु!

उस्मानाबाद :(प्रतिनीधी ) पावणेदोन महिन्यानंतर आकरा मे रोजी सुरु झालेली बस सेवा कोरोना बाधित रुग्ण आढळुन आल्यामुळे त्याच दिवशी सायंकाळी बंद ठेवण्यात आली होती. आता जिल्हाधिकायांनी नव्याने आदेश काढून उस्मानाबाद.तुळजापुर कळबं नगर पालिकेचे क्षेञ वगळता भुम.परंड़ा.उमरगा आगारातुन बससेवा सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.त्यानूसार राज्य परिवहन महामंडळाची सेवा 22मे पासून अर्ध्या भागात सुरु होत आहे.
जिल्ह्याधिकायांच्या आदेशानंतर 50% आसनक्षमता आणि सोशल ड़िस्टन्सिंगचे पालन करुन परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रणकांनी बस सेवा चे वेळापत्रक ही निश्चित केले आहे.परंड़ा भुम उमरगा आगारातुन विविध मार्गावर बस फेरीच्या मार्ग आणि परंड़ा आगारातुन विविध मार्गावर बस फेरींचा मार्गे आणी वेळा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या नुसार उमरगा आगारातुन बेबंळी.नागरवाड़ी.दाळिंब.कंटेकुर.ड़िग्नी.नळदुर्ग या मार्गावर बस सोड़ण्यात येणार आहेत.
भुम आगारातुन येड़शी.वाशी.ईट.येरमाळा देवळाली येरमाळा मार्गावर बस सोड़ण्यात येतील.
परंड़ा आगारातुन वारदवाड़ी.भुम.ड़ोण्जा.तादंळवाड़ी. आनाळा -तादंळवाड़ी या मार्गावर बस सेवा चे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.अशी माहिती महामंडळाच्या विभागीय नियंत्रणाकांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment