Friday, May 1, 2020

स्वाती नगर व साईनगर भागात प्रचंड पाणीटंचाई.नागरिकांची पाण्यासाठीची भटकंती नगरपालिकेने त्वरित थांबवावी ;- प्रा पवन मुंडे

परळी प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतांना शहरातील मध्यवर्ती भागातील प्रभाग 13 मधील नाथ टॉकीज समोरील स्वाती नगर व अमर मैदाना बाजूच्या साई नगर भागातील सर्व विंधनविहिरी आटल्याने व तेथे नगरपालिका ची पाइपलाइन नसल्याने तेथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाई चा सामना करावा लागत आहे तरी त्वरित नवीन पाइपलाइन जोडून नळ जोडणी करावी अन्यथा पाण्याचे टँकर चालू करावेत अशी मागणी नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.
एकतर कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मुळे लोक घरात बसून आहेत पण सर्व विंधनविहिरी आटल्याने व नगरपालिकेची पाण्याची पाइपलाइन तिथे नसल्याने तेथील नागरिकांना प्यायला सुद्धा पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे,भयबीत वातावरणात सोशल डिस्टन्स राखत वणवण फिरून सुद्धा पाणी मिळत नसल्याने त्या परिसरातील नागरिक परेशान होऊन हवालदिल झाले आहेत तरी नगरपालिकेने त्या परिसरात त्वरित नवीन पाइपलाइन टाकून लोकांना नळाचे कनेक्शन द्यावे अन्यथा किमान टँकर ने तरी तिथे पाणी पुरवावे अशी मागणी नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment