Friday, May 8, 2020

शेतकऱ्यांच्या सुविधासाठी बी बियाणे आणि खत आता थेट बांधावर-सभापती सौ.उर्मिलाताई गित्ते

* कोरोना विषाणूचे संक्रमण थोपविण्यासाठी पंचायत समितीचा महत्वपूर्ण निर्णय.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
खरीप हंगाम 2020 मध्ये बि बियाणे तसेच खत खरेदीसाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांनी गर्दी करण्याची कोणतीच आवश्यकता नसून नोंदणीनुसार शेतकऱ्यांच्या गाव बांधावर बि बियाणे आणि खते उपलब्ध होतील अशी सुचना परळी पंचायत समितीच्या वतिने कृषी साहित्य विक्रेत्यांना करण्यात आल्याची माहिती सभापती सौ.उर्मिलाताई बबनभाऊ गित्ते व उपसभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे यंानी दिली आहे.
परळी तालुकयातील शेतकरी बांधव खरीप हंगाम 2020 च्या तयारीत असून दुसरीकडे कोवीड 20 च्या पार्श्वभूमीवर बाजारात होणारी गर्दी लक्षात घेवून परळी पंचायत समितीच्या वतिने तालुक्यातील प्रमुख कृषी सेवा संचालक यांना सुचना देवून शेतकऱ्यांना त्यांच्या गावात किंवा बांधावर बि बियाणे उपलब्ध करून द्यावेत अशी सुचना केली आहे. परळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येवून गाव पातळीवर शेतकरी गटामार्फत कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांच्या मदतीने त्यांना लागणाऱ्या बियाणे व रासायनिक खताची मागणी, त्याची रक्कम गट प्रमुखामार्फत कृषी सेवा केंद्र यांच्याकडे जमा करावी, बियाणे व खते संबंधित कृषी सेवा मार्फत घरपोहंच व बांधावर पुरवठा केले जातील असे सभापती व उपसभापती यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी बाजारात यासाठी गर्दी न करता राज्य शासनाच्या संचारबंदीच्या नियमांचे पालन करावे, आम्ही आपल्याला बियाणे आणि रासायनिक खते योग्य पद्धतीने उपलबध करून देवूत असे आवाहन सभापती सौ.उर्मिलाताई गित्ते व उपसभापती बालाजी मुंडे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

No comments:

Post a Comment