Friday, May 1, 2020

ना.धनंजय मुंडें यांच्या हस्ते साधेपणाने जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण.


आज (दि. ०१ मे) महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने पार पडला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते सकाळी ठीक ८.०० वा. ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित कुंभार, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. हर्ष पोद्दार यांसह महत्वाचे अधिकारी व  पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment