गंगाखेड (प्रतिनिधी) : मराठा समाज बांधवांच्या आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत असल्याने त्यांच्या समर्थनार्थ सोमवार २३ सप्टेंबर रोजी गंगाखेड बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करत गेल्या पाच दिवसांपासून अन्न त्याग केल्याने दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे शासन जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या अखंड मराठा समाज बांधवांनी सोमवार रोजी गंगाखेड बंदची हाक देत या उपोषणाची दखल राज्य सरकारने तात्काळ घ्यावी अशी मागणी करून नायब तहसीलदार मो. अजीम, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. यावेळी अखंड मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष श्रीकांत भोसले यांच्यासह बहुसंख्य मराठा समाज बांधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment