परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी शहरातील भीमनगर साठेनगर रमानगर उखळवेस येथील अवैध धंदे बंद करण्यात यावेत यासाठी 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी परळी पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती भीमनगर दारूबंदी कृती समितीच्या वतीने देण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकार द्वारे देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील भीमनगर साठेनगर रमानगर उखळवेस येथील अवैध धंदे बंद करण्यात यावेत यासाठी परळी पोलीस स्टेशन व इतरांना अनेक वेळा लेखी निवेदने देऊन हि व प्रत्यक्षात भेटूनही कुठल्याच प्रकारची कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ आज दिनांक 25/ 9/ 2024 रोजी परळी येथे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब आले असता त्यांना लेखी निवेदन देऊन सदरील धंदे लवकरात लवकर बंद करण्यात यावेत अन्यथा 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती दिनी भीम नगर दारूबंदी कृती समितीच्या वतीने उपोषण करण्यात येईल असे लेखी निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर नगरसेवक नितीन रोडे सोपानराव ताटे गुत्तेदार अनिल मस्के उत्तम समुद्रे युवक नेते भारत ताटे अडवोकेट संजय जगतकर विलास आदोडे भैय्यासाहेब आदोडे महादू रोडे अंबादास रोडे बालासाहेब जगतकर आधीच्या सह्या असून सदरील धंदे बंद करण्यात यावेत याचे लेखी निवेदन माननीय जिल्हाधिकारी कार्यालय बीड ,तहसीलदार साहेब तहसील कार्यालय परळी ,पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन परळी शहर. इत्यादींना देण्यात आल्याची माहिती ही प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे
No comments:
Post a Comment