Sunday, September 22, 2024

लिंबागणेश येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार.


बीड (प्रतिनिधी)  लिंबागणेश येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज ७ च्या दरम्यान घडली आहे. यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.

अधिक माहिती अशी कि, अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान लिंबागणेश येथील डवरी वस्ती याठिकाणी आज ७ च्या दरम्यान भीषण अपघात झाला. यामध्ये विजय प्रल्हाद विघ्ने वय २७ वर्षं रा.वाघिरा ता.पाटोदा जि.बीड येथील रहिवासी मोटारसायकलने लिंबागणेश येथून वाघिरा गावाकडे जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत जागेवरच ठार झाला. सदर घटनेची माहिती मिळताच लिंबागणेश येथील पोलिस चौकीचे अंमलदार संतोष राऊत आणि बाबासाहेब डोंगरे घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास लिंबागणेश पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment