परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी वैजनाथ शहरातील माणिक नगर गणेश फेस्टिवल मंडळाच्या वतीने प्रमुख मार्गदर्शक व माजी नगरसेवक विठ्ठलराव दंदे यांच्या नेतृत्वात गणेशोत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांसह स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून माणिक नगर फेस्टिवल मंडळाने सामाजिक कार्य आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी गणेशोत्सव मिरवणूक, सजावट, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा आणि होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेत शहरातील 200 हून अधिक महिला व विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला.
संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम अंकिता खेत्रे, होम मिनीस्टर स्पर्धेत प्रथम अनुसया जातकर, द्वितीय सिमा बेदरकर यांनी बक्षीस मिळविले. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विजेत्यांना पारितोषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी विठ्ठल दंदे व ज्येष्ठ नेते माधवराव ताटे यांनी आपल्या मनोगतात स्पर्धांच्या महत्त्वाबद्दल विचारले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये ज्येष्ठ नेते माधवराव ताटे, प्रशांतकुमार शास्त्री, काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष वैजनाथ गडेकर, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर खर्डे, शिवाजी म्हाळगी, दिगंबरराव तपासे, वसंतराव कुलकर्णी, उमाकांत म्हाळगी, विजय सदरे, राजाभाऊ शिंदे आणि गजानन पांढरे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन दत्ता म्हाळगी, गणेश ठाकुर, निखील शास्त्री, गणेश सदरे, पांडुरंग खर्डे, ओम खर्डे यांनी केले. गणेश मुर्तीची स्थापना किशोरभाऊ दंदे यांच्या हस्ते करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणिक नगर गणेश फेस्टिवल मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमामुळे सामाजिक एकजुटीला वाव मिळाला आणि सांस्कृतिक वारसा जपला गेला.
No comments:
Post a Comment