Friday, September 20, 2024

बीड शहर डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई.बनावट नोटा. व गावठी पिस्टल प्रकरणी पुण्यात जाऊन केली कामगिरी.

बीड (प्रतिनिधी) आठवडाभरापूर्वी बनावट नोटांचा गुन्हा बीड शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असून त्याच्यामध्ये एक आरोपी अटक आहे आणि नवीन आणखी पाच आरोपी निष्पन्न झालेले आहेत. यातील फरार आरोपींचा शोध चालू असून यातील मुख्य सूत्रधार मनीस क्षीरसागर हा गुन्हा दाखल झाल्यापासून बनावट नोटांच्या साहित्यासह फरार आहे. यातील तपासातून पुढे आलेली माहिती अशी की, बनावट नोटा प्रकरणातील प्रमुख सूत्रधार मनिष क्षीरसागर हा पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणणार होता.  या कामी त्याला त्याचा मित्र प्रवीण गायकवाड राहणार भक्ती कन्स्ट्रक्शन, बीड, हल्ली मुक्काम आंबेगाव पुणे हा मदत करत होता. यासाठी प्रवीण गायकवाडला मनीष क्षीरसागर ने बनावट नोटांची नमुने आणि एक पिस्तल सुद्धा पाठवले होते आणि दोन लाखात चार लाख रुपये देण्याचे ठरले होते, अशा प्रकारची डील झाली होती. तसेच सदरील रक्कम ही किंवा बनावट पैसे हे सिंहगड कॉलेजला यातील आरोपी प्रवीण गायकवाड हा विद्यार्थ्यांचा प्रवेश देण्यासाठी जी रक्कम द्यावी लागते त्या रकमेत घुसवणार होता. यामध्ये प्रवीण गायकवाड ला मदत करणारे पुणे येथील लोक असण्याची शक्यता आहे याचाही तपास चालू आहे. हे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पुणे येथे प्रवीण गायकवाड ला अटक करण्यासाठी एका टीमला पाठवण्यात आले. टीमने प्रवीण गायकवाड यास बनावट नोटांसह आणि एक गावठी पिस्टल अशा प्रकारचे हत्यार त्याचे राहते घर आंबेगाव इथून जप्त केले आहे. तसेच यातील आरोपी प्रविण गायकवाड आणि आकाश जाधव या दोघांचेही दिनांक चोवीस सप्टेंबरपर्यंत पीसीआर मिळालेला आहे.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विश्वंभर गोलडे, शितलकुमार बल्लाळ, पोलीस निरीक्षक बीड शहर, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबा राठोड, बाळासाहेब सिरसाठ, मनोज परजणे, अशपाक सय्यद,  जयसिंह वायकर या अंमलदार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment