परळी वैजनाथ (वार्ताहर) शंकर पार्वती नगर कन्हैया अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेत गणपती बप्पा समोर संस्थानच्या वतीने भक्तीपूर्ण वातावरणात पार पडले किर्तन
या कीर्तनामध्ये ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे यांनी श्री गणेशाच्या जीवनातील विविध प्रसंगांचे सविस्तर वर्णन करून उपस्थित भक्तांना व संस्थेतील मुलांना व मुलींना तसेच उपस्थित पालकांना तरूण बांधवांना गणेशभक्तीची गोडीलागावी म्हणून महाराजांनी गणेश बप्पांची मुर्ती का बसवावी व नऊ दिवसांसाठी बप्पाची मिरवणूक काढून विसर्जन का करावे अशी सुंदर किर्तनातुन सविस्तर माहिती श्रोत्यांना गणेशाच्या विविध चमत्कारिक घटनांचा समावेश करून गणेशाच्या जीवनातील महत्वाच्या तत्त्वांचे विश्लेषण जनाई महाराजांनी केले.
श्री गणेशाचे विविध प्रमाणे किर्तनात भक्तीमय वातावरणात आपल्या ओजस्वी आणि रसाळ गायनातून सादर केले ज्यामुळे भक्तमंडळींचे मनोबल उंचावले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती होती, आणि उपस्थित भक्तांनी आणि श्रद्धेने कीर्तनाचा लाभ घेतला. ह.भ.प. जनाई महाराज यांच्या गणपती बप्पा मोरयापुढच्या वर्षी लवकर या वातावरण भक्तिरसात न्हालेलं होतं, जेणेकरून समारंभाचे धार्मिक महत्त्व आणि भक्तीभावना अधिकच खुलून आल्या.आलेल्या भाविकाचे आभार संस्थानच्या वतीने मानले
No comments:
Post a Comment