Sunday, September 1, 2024

20 वर्षापासून स्मशानाभुमी नाही.स्मशान भूमीची दुरावस्था,मृतदेहाची हेळसांड, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला गांभीर्य नाही.


बीड (प्रतिनिधी)  बीड तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कलचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिंबागणेश येथील स्मशानभूमीचे काम आ.संदिप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे रखडलेले असुन पावसात अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तिव्र नाराजी असुन " सरण रचुन ठिय्या"आंदोलन केल्यानंतर आ.संदिप क्षीरसागर यांनी दिड वर्षांपूर्वी स्मशानभूमीसाठी मंजुर केलेल्या 8 लक्ष रुपयांच्या निधीतून अद्याप काम पूर्ण का नाही? त्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर साहेब नरकयातना संपणार कधी? आणि लिंबागणेश येथील स्मशानभूमीचे काम पूर्ण होणार कधी?? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी विचारला आहे.

 20 वर्षापासून स्मशानाभुमी नाही...!

लिंबागणेश येथील 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीची दुरावस्था असुन पत्रे उडुन गेलेले, बांधकाम ढासळलेल्या अवस्थेत असल्याने नविन स्मशानभूमी बांधकामासाठी निधी देण्यात यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी स्मशानभूमीत सरण रचुन ठिय्या आंदोलन केले होते. याची दखल आ.संदिप क्षीरसागर यांनी घेत जिल्हा वार्षिक (दहन/दहनभुमी) जन सुविधा विशेष अनुदान योजनेंतर्गत मुलभूत सुविधांसाठी सन 2022-23 आर्थिक वर्षाकरीता ग्रामपंचायत लिंबागणेश येथे स्मशानभूमी बांधकाम व सुशोभीकरणासाठी 8 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करत दि.31 मार्च 2023 रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती.मात्र आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांच्या हलगर्जीपणामुळे स्मशानभूमीचे काम रखडलेले असुन  काल सायंकाळी अल्पशा आजाराने मयत झालेल्या कै.केशरबाई तुळशीराम नाईकवाडे यांचा अंत्यविधी आज दि.1 सप्टेंबर रोजी सकाळी भर पावसात करावा लागला. यावेळी पावसामुळे तारांबळ उडाली असून ग्रामस्थांनी रखडलेल्या स्मशानभूमीच्या कामामुळे पावसात अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की आल्याने तिव्र नाराजी व्यक्त केली.

*स्मशानभूमीची दुरावस्था,मृतदेहाची हेळसांड, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला गांभीर्य नाही...

बीड जिल्ह्यातील 1394 पैकी 656 लहान मोठ्या गावात स्मशानभूमीची सोय नसल्याने पावसाळ्यात मृतदेहाची हेळसांड होत आहे.तर आस्तित्वात असलेल्या स्मशानभूमीची दुरावस्था असुन ढासळलेले बांधकाम, उडुन गेलेले पत्रे तर काही ठिकाणी काटेरी झुडुपातुन वाट काढत दहन शेडकडे जावे लागते. काही गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने अंत्यसंस्कार रोखण्यात आल्याच्या घटना घडलेल्या आहेत.त्यातुन वादविवाद निर्माण होतात, सामाजिक स्वास्थ्य बिघडते मात्र याचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला गांभीर्य दिसून येत नाही.वारंवार निवेदने तसेच आंदोलनानंतर सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही हि दुर्दैवी बाब आहे.

No comments:

Post a Comment