Sunday, September 15, 2024

बीड जिल्ह्यातील ईद-ए-मिलाद ची सुट्टी गुरुवारी 19 सप्टेंबर रोजी !


बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये सोमवारी असलेली ईद-ए-मिलाद ची सुट्टी प्रशासनाने रद्द केली असून त्या ऐवजी ही सुट्टी 19 सप्टेंबर गुरुवार रोजी देण्यात आली आहे.राज्य सरकारने मुंबई आणि उपनगर मधील ईद ची सुट्टी बुधवारी दिली तसेच इतर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांना अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार बीडला गुरुवारी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.

राज्यात 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद आणि गणपती विसर्जन हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्यामुळे आणि दोन्ही सणांच्या दिवशी दोन्ही धर्मीय नागरिक मिरवणुका काढत असतात. त्या अनुषंगाने जातीय तेढ अथवा वाद निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने 16 सप्टेंबर ची सुट्टी मुंबई आणि मुंबई उपनगर मध्ये रद्द करण्यात आली होती. त्या अनुषंगाने याच राजपत्राच्या धरतीवर त्या त्या जिल्ह्यातील प्रशासनाला सुट्टी कधी द्यायची यासंदर्भातील अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाने आपल्या सुट्ट्या आपल्या पद्धत जाहीर केले आहेत.
बीड जिल्ह्यातील ईद-ए-मिलाद ची सुट्टी गुरुवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी जाहीर केली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिले आहेत

No comments:

Post a Comment