Tuesday, September 3, 2024

परळीत सरस्वती नदीच्या पुराचे पाणी घुसले.जवळपास १००० कुटुंबाच्या घरात साखर झोपेतील नागरिकांची उडाली तारांबळ.

जवळपास १००० कुटुंबाच्या घरात पाणी घुसून घरातील संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. या भागातील घरात चार फूट पाणी साचले. अनेकांच्या घरात चिखल झाला आहे.यामुळे या भागात हाहाकार माजला. पहाटे साडेपाच वाजता परळी चे उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर,नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, नगरपालिका मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, उपमुख्य अधिकारी संतोष रोडे, नगर अभियंता ज्ञानेश्वर ढवळे , अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन स्वच्छता  विभागाचे शंकर साळवे, सुनील आदोडे यांनी भेट देवून पाहणी केली . 


व मदत कार्य केले. नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. नाल्यात साचलेला कचरा काढण्यासाठी जेसीबीच्या दोन मशीन लावण्यात आल्या आहेत. 

सकाळी ११ वाजेपर्यंत प्रशासनातील अधिकारी थांबून नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना केल्या व  नगरपालिकेने नऊ ठिकाणी राहण्याची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था केली आहे. 

मुसळधार पावसामुळे परळीतील सरस्वती नदीच्या पात्रात पूर आल्याने १००० कुटुंबाच्या घरात पाणी शिरले आहे. प्रशासनाने तातडीने भेट देऊन या भागातील नागरिकांना नऊ ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आवाहन केले तसेच या भागातील नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यासाठी एक पथक नेमण्यात आले या पथकात तलाठी नगरपालिका कर्मचारी पंचायत समिती कर्मचारी असतील अशी माहिती परळी उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी दिली. 

परळी नगरपालिकेच्या वतीने पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे असे परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी सांगितले. पूरग्रस्त भागातील लोकांना निवाऱ्याची सोय परळीतील  शाही फंक्शन हॉल बरकत नगर ,मिलिया स्कूल, बागवान शादी खाना, जिल्हा परिषद शाळा बरकत नगर ,समाज मंदिर ,भीमानगर , झमझम पार्क इर्शाद नगर, कुरेशी शादी खाना या ठिकाणी करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. 

No comments:

Post a Comment