बीड लोकसभा निवडणुकीसाठी ७४ उमेदवारांनी ९९ अर्ज दाखल केले होते. मात्र अर्जाची छाननी झाली तेव्हा १९ अर्ज बाद झाल्याने ५५ उमेदवार रिंगणात होते. या दरम्यान अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चार पक्षाच्या उमेदवारांसह १० अपक्ष अशा १४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात ४१ उमेदवार आहेत. यामध्ये नोटांचा एक पर्याय असणार आहे. यासाठी एका बूथवर ३ ईव्हीएम लागणार आहे. २५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात २१ लाख ४२ हजार ५४७ मतदारांची नोंदणी झाली असून हे मतदार आपला खासदार निवडणार आहेत.
१३ मे ला होणार मतदान
दरम्यान बीड लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान होत आहे. मतदानासाठी अवघे १३ दिवस उरले आहेत. आता लोकसभेचे चित्र स्पष्ट झाले असून ४१ उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात २ हजार ३५५ मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी २५ ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आलेले आहेत. त्यामध्ये माजलगाव ६, गेवराई ३, परळी ३, केज ४, आष्टी ६ आणि बीड ३ असे चेकपोस्ट आहेत.

No comments:
Post a Comment