Tuesday, April 23, 2024

ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची गंगा आणणारे भगीरथ : गोविंदराव देशमुख


घाटनांदूर ता. अंबाजोगाई जि.बीड ही निजाम काळापासून आजपर्यंत महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाणाऱ्या गावांमध्ये  श्री.गोविंदराव देशमुख यांच्या जन्म  शैक्षणिक वारसा असलेल्या परिवारात  वडील श्री. बालासाहेब व माता सौ. शारदाबाई देशमुख यांच्या पोटी झाला.
श्री.गोविंदराव देशमुख यांचे बालपण अत्यंत आनंदात गेले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण धाराशिव( उस्मानाबाद) येथे मामाच्या गावी झाले.त्यांनी बी.एस्सी.अँग्री ही पदवी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी  येथून संपादन केली. आणि येथेच गोविंदरावांच्या राजकीय,सामाजिक व शैक्षणिक जीवनाला आयाम भेटला. विद्यार्थी असताना भारतीय विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव म्हणून त्यांनी अतिशय कार्यक्षमपणे  पार पडली.  यावेळी अनेक ज्येष्ठ व अनुभवी राजकीय नेत्याशी निकटचा संबंध आला.आणि गोरगरीब व होतकरू  विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष त्यांनी सुरू केला. बी.एस्सी.अँग्री केल्यानंतर नोकरी न करता राजकारण आणि समाजकारण क्षेत्र निवडून गोरगरीब, वंचित, दीन दलित समूहाला न्याय, हक्क व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी काम करायचे असे ठरविले आणि ते कार्य निरंतरपणे  चालू आहे.
श्री. गोविंदराव देशमुख यांचा स्वभाव म्हणजे प्रेमळ व मायेचा उब देणारा आहे. लहान- थोर कुणीही भेटले तरी त्या व्यक्तीला आपला माणूस आहे असे वाटते. ते सतत हसतमुख व बोलण्यामध्ये गोडवा आणि विचारात सकारात्मकता असणारे व्यक्तिमत्त्व होय. गोविंदराव देशमुख हे  सर्वसामान्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे व्यक्तिमत्व होय.  यामुळे  गोविंदराव देशमुख हे जनतेच्या व नेताच्या  गळ्यातील ताईत बनले आहेत.केज- अंबाजोगाई  व परळी मतदार संघातील सर्व जनतेचे व नेत्यांचे ते आवडते नेते आहेत.  त्यामुळे त्यांना आदराने सर्व भैय्या, अप्पा, भैय्यासाहेब असे म्हणतात.  
श्री.गोविंदराव देशमुख यांनी अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती व दोन वेळा प्रशासक म्हणून पद सांभाळले आहे. त्याचबरोबर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे दोन वेळा सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. या काळात त्यांनी उच्च शिक्षणामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचे निर्णय विद्यापीठास  घेण्यास भाग पाडले.त्यामुळे विद्यापीठातील व  संलग्नित महाविद्यालयाच्या प्रशासनात  पारदर्शकता व विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी कमी होण्यास मदत झाली आहे. श्री गोविंदराव देशमुख यांनी घाटनांदुर ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटी चेअरमन खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. आज ते आंबा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून कार्यरत आहे त्यांचे शिक्षण सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान राहिले आहे.
  श्री.गोविंदराव देशमुख यांनी कोरोना काळामध्ये शासनाचे आरोग्यदूत व जनतेचे देवदूत म्हणून काम केले आहे.मा. ना. पालकमंत्री श्री. धनंजय जी मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घाटनांदूर व बर्दापूर येथे कोविड सेंटरची उभारणी करून अनेक रुग्णांचे जीव वाचवले आहेत. कोविड काळात आपला वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचा होणारा खर्च गोरगरीब व रुग्णांना अन्नधान्य, औषधे देऊन मदत केली. हे कार्य आजही ते अविरतपणे करीत आहेत.
श्री.गोविंदराव देशमुख यांनी कामधेनू सेवाभावी संस्थेची स्थापना करून  स्वतःला आलेल्या उच्च शिक्षणाच्या अडचणी त्या इतर कोणाच्याही  वाटेला येऊ नयेत म्हणून सन 2000 मध्ये स्वर्गीय मंत्री सौ. विमलताई मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली वसुंधरा महाविद्यालयाची स्थापना केली आणि घाटनांदूर व परिसरातील वाड्या तांड्यातील मुलांसाठी उच्च शिक्षणाची गंगा आणली. उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना शिक्षणाचे अमृत पाजवण्याचे काम केले. त्यामुळे त्यांना ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची गंगा आणणारे भगीरथ म्हणतात. तसेच गोरगरीब शिक्षित मुलांना नोकरी, व्यवसायासाठी आर्थिक मदत व सहकार्य करतात. अशा या कर्मयोगी भगीरथाला वाढदिवसाच्या लक्ष -लक्ष शुभेच्छा व  उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो तसेच आपल्या हातून समाजातील अनिष्ट,रुढी,परंपरा नष्ट होऊन गोरगरीब , दीन दलित व वंचिताची  सेवा व्हावी, हीच सदिच्छा.. !

प्रा. डॉ.गजानन सवने,
वसुंधरा महाविद्यालय, घाटनांदूर,
ता. अंबाजोगाई जि. बीड 
मो.नं.9421992335
ईमेल - drgajanansawane@gmail.com

No comments:

Post a Comment