Wednesday, April 10, 2024

नशेत धुंद तरुणाचा धुडगूस किराणा दुकानातील सामान फेकले, स्वतःच्या अंगावर केले ब्लेडने वार.


*गेल्या तीन- चार दिवसापासून माजलगाव शहरामध्ये विविध घटना घडत आहेत. आमदार प्रकाश सोळुंके यांच्या पीए ला भररस्त्यात मारहाण झाल्यानंतर मनोरुग्न महिलेने पोलीस ठाण्यावर दगडफेक केल्याची देखील घटना घडली होती. 

माजलगाव (प्रतिनिधी) 
: नशेत धुंद झालेल्या एका तरुणाने धुडगूस घातला असून शहरातील किराणा दुकानावर धुडगूस घालत  दुकानदाराचे गचुरे पकडत सामान फेकून दिले. इतकेच नाही तर या तरुणाने स्वतःच्या अंगावर ब्लेडने वार करून घेतले आहे. हा प्रकार बीडच्या माजलगाव शहरात घडला आहे. 
गेल्या तीन- चार दिवसापासून माजलगाव शहरामध्ये विविध घटना घडत आहेत. आमदार प्रकाश सोळुंके यांच्या पीए ला भररस्त्यात मारहाण झाल्यानंतर मनोरुग्न महिलेने पोलीस ठाण्यावर दगडफेक केल्याची देखील घटना घडली होती. त्यानंतर आज पुन्हा एका नशेत धुंद असणाऱ्या तरुणाने धुडगूस घालत राडा केला आहे. यावेळी अनेकांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र मी कोणाला भीत नाही, कोणाला फोन लावायचा त्याला लावा. असं म्हणत या तरुणांने किराणा दुकानावरच धुडगूस घातला. 
विशेष म्हणजे किराणा दुकानावर काही सामानाचे देखील त्यांनी फेकाफेक केली. शिवाय या तरुणाने स्वतःच्याच अंगावर ब्लेडने वार केले. यात तो जखमी झाला आहे. दरम्यान एक तासानंतर नागरिकांच्या अथक परिश्रमानंतर नशेत धुंद असणाऱ्या तरुणाला शांत करून बाजूला नेले. दरम्यान याप्रकरणी अद्यापपर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नाही. 

No comments:

Post a Comment