परळी वैजनाथ (प्रतिनिधी) अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याकाळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्व जाती धर्मांना शिक्षणाचे महत्व पटवून सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुले केली. येणार्या काळात विद्यार्थ्यांनी व युवकांनी या महापुरुषाचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक चळवळ उभा करणे गरजेचे असून हेच महात्मा ज्योतिबा फुले यांना खर्या अर्थाने अभिवादन ठरणार असे वक्तव्य यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल दुबे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना व्यक्त केले.
नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतीबा फुले जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्येातीबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्य अतुल दुबे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पुढे बोलतांना प्राचार्य अतुल दुबे यांनी सांगितले की, 11 एप्रिल 1827 रोजी सामान्य कुटुंबात जन्मलेले महात्मा ज्योतिबा फुले यांनी लहान वयापासूनच शिक्षणाचे महत्त्व समजून घेतले. त्याकाळी शिक्षण शिकणे व शिक्षण घेणे हे फक्त श्रीमंत कुटुंबातील लोकांचे काम होते सामान्य लोकांना शिक्षण घेणे हे कठीण होत चालले होते. अशा परिस्थितीत ज्योतिबा फुले यांनी सर्व जाती धर्मांना शिक्षण भेटावे ही मनाशी खून गाठ बांधली आणि त्यात क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले यांची खंबीर साथ त्यांना लाभली. म्हणूनच आज मुलगी मोठ्या पदा पर्यंत पोचली आहे हे विसरता येणार नाही.
आजच्या विद्यार्थ्यांनी व तरुणांनी फुले दांपत्यांची शैक्षणिक चळवळ पुढे सुरू ठेवून तळागाळापर्यंत त्यांचे विचार पोचवावे हेच खरे ज्योतिबा फुले यांना अभिवादन आहे असे विचार प्राचार्य अतुल दुबेे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रा.यु.एम.फड, एस.बी.अष्टेकर, व्ही.एन.शिंदे, एम.पी.सातपुते, यु.बी.जगताप यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment