Monday, April 22, 2024

रस्त्याच्या मागणीसाठी लोकसभा निवडणू क मतदानावर बहिष्कार.मंडळ अधिकारी, तलाठी यांनी विनंती करूनही ग्रामस्थ ठाम.


गंगाखेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील राणीसावरगाव ते गौळवाडी रस्ता कामाच्या मागणीसाठी गौळवाडी, उंबरवाडी, दामपुरी अंतर्गत उघडेवाडी, पांगरी अंतर्गत पांढरेवाडी गावातील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर टाकलेला बहिष्कार मागे घेणार नसल्याचे सांगत, रस्ता होत नाही, तोपर्यंत बहिष्कारावर ठाम राहणार असल्याचे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी आज गौळवाडी व डूमनरवाडी येथे ग्रामस्थांची बैठक घेऊन केलेल्या पंचनाम्यादरम्यान सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गांगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव ते गौळवाडी रस्त्याचे काम मागील २० वर्षापासून झाले नसल्याने, या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्यामुळे या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. निवेदनात नमूद करून या रस्त्यावर असलेल्या विलासनगर, उमाटवाडी, डूमनरवाडी, उंबरवाडी, करलेवाडी, उघडेवाडी, पांढरेवाडी, गौळवाडी, गौळवाडी तांडा आदी गावातील ग्रामस्थांना येथून रहदारी करतांना जीव मुठीत घेवून रहदारी करावी लागते. गावातील आजारी रुग्ण, गर्भवती महिलेला रुग्णालयात जातांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे विविध समस्यांचा सामना करून रुग्णालयात जावे लागत आहे.

गंभीर आजारी रुग्णांचा या रस्त्यामुळे रुग्णालयात पोहचण्या आधीच जीव जात असल्याने, संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीसह आगामी काळातील सर्वच निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत, दिनांक १८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे बहिष्काराचे निवेदन सादर केले.

यावरून आज गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव मंडळाचे मंडळ अधिकारी सिद्धार्थ बागुल, पांगरी सज्जाचे तलाठी शंकर गोरे यांनी गौळवाडी व डूमनरवाडी या गावांना भेटी देवून तक्रारकर्ते ॲड. नागोराव निवृत्ती तांबरे यांच्यासह अन्य पंच व ग्रामस्थांना एकत्र बोलावून, निवडणुकीवरील बहिष्काराच्या अनुषंगाने गौळवाडी व डूमनरवाडी येथे ग्रामस्थांची बैठक घेवून आपण निवडणूक मतदानावर टाकलेला बहिष्कार मागे घेवून १०० टक्के मतदान करावे, अशी विनंती केली. आमच्या रस्त्याचा प्रश्न मिटल्याशिवाय गावातील एकही मतदार मतदान करणार नाही. मतदान केंद्र गावात येऊ देणार नाही. जिल्हाधिकारी यांनी गावात येऊन लेखी आश्वासन द्यावे, आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचा निवडणूक मतदानावरील बहिष्कार कायम राहील,  अशी भूमिका घेतली.  यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी घेतल्यामुळे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी तसा पंचनामा करून ग्रामस्थांच्या स्वाक्षरीसह तहसील कार्यालयात सादर केला आहे.

गौळवाडी व डूमनरवाडी येथे झालेल्या बैठकीस ॲड. नागोराव निवृत्ती तांबरे, सोपानराव नागरगोजे यांच्यासह बाबुराव मुसळे, विश्वनाथ मुसळे, शिवाजी दहिफळे, अंतराम चाटे, अविनाश राठोड, मारोती मुसळे, संग्राम चाटे, संदीप मुसळे, संग्राम डूमनर, संभाजी पांढरे, पंडीत डूमनर, हरिश्चंद्र पांढरे, नागोराव घडे, नारायण तांबरे, दयानंद घडे, सोपान चिटे, शोभाबाई मुसळे, मीराबाई केंद्रे, सुरेखा मुसळे, नामदेव डूमनर, लक्ष्मण घडे, शाहू बोमदरे, अनिता घडे, अंजना चिटे, संगीता भागवत घडे, सखुबाई सर्जेराव हाके, संजीवनी बाबुराव घडे, वैष्णवी बालाजी हाके आदी बहुसंख्य महिला व नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment