परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील वीट उद्योग व्यापाऱ्याची हैदराबादच्या एकाने 39 लाखांच्या विटांचा व्यवहार करून 14 लाखांना फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, शेख मकसूद मुजीब शेख रा.इस्लामपुरा या वीट व्यापाऱ्याने खैसर अकबर पठाण रा. हैद्राबाद याच्याशी वीटा खरेदीचा व्यवहार केला. यावेळी शेखकडून 39 लाख 2 हजार 700 रुपयांच्या विटा खैसर अकबर पठाण घेऊन गेला होता.यातील 25 लाखांची रक्कम आरोपीने फिर्यादीच्या खात्यावर पाठविली. तर उर्वरित 14 लाख 2 हजार 700 रुपयापैकी 11 लाख 45 हजारांचा चेक देण्यात आला होता. मात्र सदरचा चेक न वटल्याप्रकरणी तक्रार अर्ज दिल्याने अर्ज चौकशीवरुन आरोपीविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाणे करीत आहेत.
No comments:
Post a Comment